Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

हिंगोली लोकसभेसाठी 66.52 टक्के मतदान

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मतदान शांततेत पार पडले. 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 66.52 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 हजार 997 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रीया पार पडली. त्यानुसार  विधानसभा मतदार

किनवट विधानसभा मतदारसंघात 68.78 टक्के मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत शांततेत मतदान पार पडले हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत किनवट विधानसभेत 1 लाख 77 हजार 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 28 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. एकूण 68.78 टक्के मतदान झाले आहे . मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात शांततेत यशस्वी करण्यासाठी 2 हजार 600 अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड परिश्रम घेतले.

माहूरच्या सेना-भाजप व राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी…

माहूरात रस्ते झाले निर्मनुष्य.. तणावाची परिस्थीती.. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत एकेरी व कौटुंबिक कलह निर्माण होईल असे वक्तव्य केल्याबद्दल आज माहूरात राष्ट्रवादी काँग्रेस व सेना-भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाल्याने माहूरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मारहाणीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वाई बाजार येथील

नांदेड लोकसभा मतदारसंघात 65.15 टक्‍के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण 65.15 टक्के मतदान झाले. 16 – नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते. यात पुरुष मतदार संख्‍या 8 लाख 91 हजार 105 तर महिला मतदार संख्‍या 8

अगोदर मतदान…नंतर वारी..मतदान करण्यासाठी असाही संकल्प

मुखेड तालुक्यातील अनेक नागरीक चंद्रपुर येथील महाकाली देवीच्या दर्शनासाठी गाडया बांधून जात असतात. पोर्णिमा दि. 19 रोजी आल्यामुळे मागील चार ते पाच दिवसापुर्वी अनेक नागरीक गाडया बांधुन रवाना सुध्दा झाले पण शहरातील डोईजड परिवारातील सदस्यांनी अगोदर मतदान करण्याचा निर्धार केला. सकाळी 8 वाजता डोईजड, कुंभारकर, घोगरे परिवारातील सदस्यांनी आपल्या परिवारासह मतदान केले अन नंतरच चंद्रपुर

निवडणुकीची धामधूम संपताच; प्रणीताताई पाणी फाउंडेशन’च्या श्रमदानात सक्रीय !

वीस – पंचवीस दिवसाच्या अहोरात्र धामधूमीनंतर विश्रांतीला फाटा देत जि.प. सदस्या प्रणीताताई देवरे –चिखलीकर या पाणी फाउंडेशन’मध्ये सक्रीय झाल्या आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच गुंडेवाडी येथे श्रमदान केले तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.नांदेड लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील उमेदवार होते वडिलांच्या प्रचारार्थ जि.प. सदस्या प्रणीताताई देवरे यांनी संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रात किमान तीनशे सव्वा तिनशे गावात भेटी

आधी मतदान करून वर्हाडी मंडळींसह वधू – वर लग्नासाठी रवाना…

नवीन नांदेड कौठा येथील नरोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या माने – जाधव परिवाराने लग्ना अगोदर तब्बल २८४ वर्हाडी मंडळी सोबत नियोजित वधू – वर यांनी मतदान करुनच किनवट येथे होणाऱ्या शुभ विवाहास रवाना झाले. या परिवाराने नियोजित शुभ विवाहाची वेळ बदलून अगोदर मतदान नंतरच लग्न हा वेगळा आर्दश समाजापुढे ठेवला, यासाठी समाजातील व परिवारातील सदस्यांसह

राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही

पहिल्यांदाच दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालविले मतदान केंद्र

नांदेड लोकसभा मतदारसंघात पहिल्‍यांदाच दिव्‍यांग कर्मचा-यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कला मंदिर जवळील नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये दिव्‍यांगानी मतदान केंद्र चालवले. या मतदान केद्रांत दिव्‍यांग कर्मचारी एस. एस. मठपती, गणेश रायेवार, किशन केने, तुकाराम सुर्यवंशी , बाबुराव मोरे, व्‍यंकटी मुंडे, गणपत शिरसाठ, अशोक सोळंके, तुषार कुलकर्णी, पदृमिनी कासेवाड, आश्विनी केंद्रे, आदी कर्मचा-यांनी

लातूरचे भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करा…!

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार लातूर मतदारसंघात मतदान सुरु असताना भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करावी आणि संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र