हनुमान जयंतीनिमित्त मारोतीरायाच्या दर्शनासाठी बोरगडीत भक्तांची तोबागर्दी

लाखो भाविक – भक्तांनी घेतले दर्शन … चैत्र शुद्ध १५ रोजी आलेल्या हनुमान जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारुतीरायाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य यात्रा उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आदींसह विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून, उद्या दि २० रोजी भव्य कुस्त्याच्या दंगलीने यात्रेचा समारोप केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे जोरदार भाषण

हिंगोली लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित हदगाव येथील काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांचे जोरदार भाषण व त्यांच्या सभेला मतदारांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता काँग्रेसला अच्छे दिन येतील असे चित्र दिसून येत आहे. छाया – उत्कर्ष मादसवार

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे हात बळकट करण्यासाठी

काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडेंना प्रचंड मतांनी निवडून आणा – जवळगावकर हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि.१८ एप्रिल २०१८ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावासमोरील पंजा निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे. आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करावे असे आवाहन हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.माधवराव

हिमायतनगरात मर्यादा पुरुषोत्तम रामजन्मोत्सव साजरा

बजरंग दलाच्या बाईक रैलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले हिमायतनगर (वाढोणा) शहरातील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, परमेश्वर मंदिर, साई मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिरसह शहर तालुक्यातील सर्वच देवी – देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीच्या दिनी दि.१३ शनिवारी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल शाखेच्या युवकांनी शहरातील

रक्तदान करून प्रभूश्रीरामांना युवकांनी केले वंदन

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामनवमी आणि हिंदू एकता दीनानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) नगरीतील छत्रपती शिवाजी चौकामधील युवकांनी रक्तदान देऊन श्री राम… जय राम… जय जय… रामच्या जयघोषात वंदन केले आहे. शहरातील रामराज्य मित्र, रामभक्त मित्रमंडळ, टायगर ग्रुप, शिवनेरी मात्र मंडळ, शंभूराजे मित्रमंडळ, विद्रोही मित्रमंडळ व शहरासह ग्रामीण भागातील रामभक्त युवकांनी संयुक्तिक रक्तदान शिबिराचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी

बासरची गोदावरी नदी कोरडीठाक…

भक्तांना करावा लागतो टंचाईचा सामना तेलंगणा राज्यातील बासर येथील माता सरस्वतीचे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून, यंदा हि गोदावरी नदी कोरडीठाक पडल्याने सुट्ट्याच्या दिवसात दर्शन व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तेलंगणा – महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्येची आराध्य दैवता समजल्या जाणाऱ्या माता सरस्वतीचे प्राचीन मंदिर असून, हे मंदिर

जिप. बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याकडून रस्त्याची थातुर मातुर पाहणी

गुत्तेदाराच्या गाडीत आले आणि परतले कामाचा दर्जा सुधारला नाहीतर गावकरी उपोषणाच्या तयारीत हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने दोन दिवसापूर्वी गावातील युवकांनी काम बंद पाडले. तात्काळ कामाचा दर्जा सुधारला नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर दि.२९ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता श्री कांबळे यांनी दुपारी

इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडून रक्कम लंपास

तीन वर्षासूनच्या चोरीचा प्रयत्न २०१९ ला चोरटयांनी फत्ते केला गेल्या तीन वर्षांपासून हिमायतनगर येथील इच्छापूर्वर्ती वरद विनायक मंदिरातील दानपेटी फोडण्याचा पर्यटन झाला असून, अखेर चोरटयांनी २०१९ मध्ये हि दानपेटी फोडून त्यातील देणगीची रक्कम लंपास केली आहे. या चोरीच्या प्रकरणाचा पंचनामा पोलिसांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यात चोरटयांनी गतवर्षी मंदिरांना लक्ष केले असून, दानपेट्या फोडून लाखोंचा माल

किरंमगाव वासियांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार

स्वातंत्र्याच्या काळापासून रस्त्याच्या प्रतीक्षेत नागरिक… समस्या मार्गी लागल्याशिवाय माघार घेणार नाही…. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या मौजे किरंमगाव येथील गावकर्यांनी रस्त्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दि.१८ रोजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्याची समस्या मार्गी लागल्याशिवाय बहिष्काराचा निर्णय मागे घेणार नसल्याचे गावकर्यांनी सांगितले आहे. गेल्या ७० वर्षांपासून