किनवट विधानसभा मतदारसंघात 68.78 टक्के मतदान

हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत शांततेत मतदान पार पडले हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत किनवट विधानसभेत 1 लाख 77 हजार 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 28 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. एकूण 68.78 टक्के मतदान झाले आहे . मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात शांततेत यशस्वी करण्यासाठी 2 हजार 600 अधिकारी व कर्मचारी यांनी प्रचंड परिश्रम घेतले.

निवडणुक यंत्रणा सज्ज, लोहा विधानसभा क्षेत्रात २ लाख ७१ हजार मतदार

३१५ मतदान केंद्र : एसआरपी जवान तैनात लोहा लोकसभा सार्वत्रीक निवडणुक 2019 लातुर लोकसभा मतदार संघासाठी दहा उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत, लोहा विधानसभा क्षेत्रातील 315 मतदान केंद्रावर दोन लाख एकाहात्तर हजार नऊशे एकोनविस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, निवडणुक मतदान यंत्रणा सज्ज झाली असुन सकाळी सहा ते सायं.सात असे अकरा तास मतदान चालणार आहे, प्रत्येक

हिंगोली जिल्ह्यात मद्य विक्रीस मनाई

भारत निवडणुक आयोगाने त्यांच्या दि. 10 मार्च, 2019 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये लेाकसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 च्या कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानूसार महाराष्ट्रातील हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी निवडणुक घेण्यात येणार आहे. तसेच दिनांक 23 मे, 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणुक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रीया संपण्याच्या

मतदान प्रक्रियेसाठी महामंडळच्या 432 बसेस

लोकसभा मतदार संघातील दुसऱ्या टप्याच्या मतदानासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून कर्मचारी व साहित्यासाठी तब्बल 432 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यासाठी दि.18 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. ईव्हीएम मशीनसह इतर साहित्य व कर्मचाऱ्यांसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी व नंतर पुन्हा त्यांना वापस आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 432 बसेस नांदेड विभागाकडून उपलब्ध करून

दामिनी पथकाने वाचवले युवकाला

आज सायंकाळी 6 वाजता बाबानगर टी – पॉईंटवर गाडीवर पळवून नेतांना दामिनी पथकाने त्या युवकाची सुटका केली. आज सर्वत्र पोलीस बंदोबस्त हजर असतांना बाबानगर टी पॉईंटवरून एम.एच.26 यु 3073 या मोटारसायकलवर एका युवकाला मध्ये बसवून घेऊन जात असतांना तो मला वाचवा वाचवा असे ओरडत होता तेंव्हा दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण, पोलीस हवालदार

भारुड, गवळणी, लोककलेच्या सादरीकरणातून मतदान जागृती

जागृती बालकला मंचाचा उपक्रम; मतदारांचा बालकलाकारांना प्रतिसाद लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी संपन्न झाले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या तुलनेत सरासरी मतदानात एका टक्क्याची घसरणच झालेली दिसून आली. दुसर्‍या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी होत असून मतदान जनजागृतीचा दीप तेवत ठेवण्याच्या उद्देशाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील २८१ जवळा देशमुख

उध्दव ठाकरेनी केली रामभाऊंची अस्थेवाईक विचारपूस

काय रामभाऊ …काय म्हणते तबियत… ! अशी अस्थेवाईक विचारपूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ चन्नावार यांची केली. निवडणुकीच्या धामधुमीत जुन्या… निष्ठावंत कार्यकर्त्यांशी थेट पक्षप्रमुखांनी संवाद साधला… हजारो उपस्थितांसाठी आणि स्वतः रामभाऊसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली लोकसभा मतदार संघात आ. हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हदगावला आले

नांदेड तालुका लोकसभेच्‍या आठरा मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 87 नांदेड दक्षिणचे अकरा मतदान केंद्र व 86 नांदेड उत्‍तरचे सात असे एकूण आठरा मतदान केंद्राच्‍या ठिकाणात मुख्‍य निवडणूक अधिकारी महाराष्‍ट्र राज्‍य यांच्‍या 30 मार्च 2019 च्‍या पत्राने विविध तांत्रीक कारणास्तव बदलण्यात आले आहे. या आठरा मतदान केंद्रामध्ये 87 नांदेड दक्षिण मधील पुर्वीचे 28,29,30 नांदेड कलामंदिर ऐवजी शासकिय आयुर्वेदिक

किनवट विधानसभा मतदारसंघ कार्यालयात टपाली मतदान

सुलभीकरण केंद्र ‘ सुविधा उपलब्ध 83-किनवट विधानसभा मतदारसंघासाठी अधिकारी /कर्मचारी यांची सेवा निवडणूक आयोगाच्या वतीने अधिग्रहित करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशा मतदारांना मतदान करण्यासाठी 15 – हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व 83 – किनवट विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात (आय.टी.आय. येथील तहसिल कार्यालय ) ‘टपाली

मतदार जनजागृतीसाठी गोकुंदा व किनवटमध्ये विद्यार्थ्यांचे पथनाट्य

किनवट येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर व गोकुंदा येथील मुख्य चौकात इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ” मी मतदान करणारच ” हे पथनाट्य बहारदार सादर करून सर्वांची मने जिंकली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 83 – किनवट विधानसभा मतदारसंघात सहायक जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कक्ष