शनिवारपेठ येथे 50 हजाराची अवैध गावठी दारू जप्त

किनवट तालुक्यातील शनिवारपेठ येथे बुधवारी लागोपाठ सहा ठिकाणी धाडी टाकून, किनवट पोलिसांनी 50 हजार 960 रुपयांची गावठी दारू व रसायण जप्त केले आहे. लोकसभा निवडणुक मतदानाच्या पूर्वसंध्येला किनवट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बूथ तपासणी करीत असतांना, पोलिसांना बेकायदेशीररित्या गावठी दारू गाळल्या जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यावरून सापळा रचून शनिवारपेठ येथे लागोपाठ सहा धाडी टाकल्या

बुलेटकडून 8500 रूपये दंड; पोलिसाकडून 900 रूपये दंड

वाहतुक शाखेची कार्यवाही नांदेड वाहतुक शाखा पोलिसांनी एका बुलेट मोटारसायकलकडून 8500 रूपये आणि एका पोलिस कर्मचाऱ्याकडून 900 रूपये दंड वसूल केला आहे. दि. 17 एप्रिल 2019 रोजी वाहतुक शाखा पोलिस वाहतुक नियमनासोबत वाहन तपासणी करीत असताना बॉस असे दिसणाऱ्या नंबर प्लेटच्या प्रकारामुळे बुलेट मोटारसायकल क्र. एम.एच. 26 ए.पी. 8055 ला थांबविली. त्या गाडीचा क्र. 8055

सदाशिव देशमुख खून प्रकरणात तिघांना पोलीस कोठडी

विरुध्द गटातील दोघांना 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सदाशिव देशमुख उर्फ किरकन खून प्रकरणातील तीन जणांना सातव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. सोबतच या घटनेतील दुसऱ्या गटाच्या दोन जणांना घरात घुसून मारहाण करण्यासाठी 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. प्राप्त माहितीनुसार दि.16 एप्रिल 2019 च्या रात्री 9 ते 9.30 दरम्यान

महिला व बालकल्याण विकास अधिकारी चालकासह सध्या तीन दिवसांसाठी तुरुंगात

25 हजारांचे लाच प्रकरण नांदेडच्या महिला व बालकल्याण अधिकारी आणि चालकाच्या जामीन अर्जावर सुनावणी 20 एप्रिल रोजी निश्चित केल्याने कमीत कमी तीन दिवसाचा तुरुंगवास नशिबी आलाच आहे. बालविकास अधिकारी धर्मपाल पोतन्ना शाहू (56) आणि कार्यालयाचा वाहन चालक ज्ञानोबा उर्फ माऊली रामचंद्र सुर्यवंशी (46) या दोन जणांना 16 एप्रिल 2019 रोजी 25 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर अटक

15 एप्रिल रोजी मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू

दामिनी पथकाने त्या युवकाचा बचाव केला होता 15 एप्रिल रोजी बाबानगर भागात एका युवकाला मारहाण करून मोटारसायकलवर पळवून नेणाऱ्या दोन युवकांपासून दामिनी पथकाने पिडीत युवकाची सुटका केली. पण दुर्देवाने मारहाण झालेल्या युवकाचा 16 एप्रिल रोजी रात्री मुत्यू झाला आहे. दि.15 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दामिनी पथकाच्यचा पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण आणि त्यांचे सहकारी

पोलीस भरती प्रकरणातील प्रविण भटकरला दुसऱ्यांदा अटकपुर्व जामीन नाकारला

पोलीस भरती घोटाळ्यात अद्याप फरार असलेला मुख्य आरोपी प्रविण भटकरचा दुसरा अटकपुर्व जामीन अर्ज चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी फेटाळून लावला आहे. 26 एप्रिल 2018 रोजी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात पोलीस भरतीतील युवकांनी लिहिलेल्या उत्तर पत्रिका बदलल्याचा गुन्हा दाखल झाला. यात ओएमआर सेवा देणाऱ्या प्रविण दत्तात्रय भटकर (34) रा. बावदन पुणे यांच्या ईटीएच

ईव्हीएम सुरक्षा कक्षाच्या परिसरात फौजदारी प्रक्रीया कलम 144 लागू

दि.16: भारत निवडणुक आयोग यांचेकडून सन-2019 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदरील निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार या कार्यालयाची अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये 15- हिंगोली लोकसभा मतदार संघामध्ये गुरुवार दिनांक 18 एप्रिल, 2019 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील 82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगांव, 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली विधानसभा मतदार

डांबर घोटाळ्यातील आरोपीची रवानगी तुरूंगात

डांबर घोटाळ्यातील सहाव्या आरोपीला दुसऱ्यांदा मागितलेली पोलिस कोठडी चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. गवळी यांंनी नाकारली आहे. डांबर घोटाळ्यातील आरोपीची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. 11 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या डांबर घोटाळ्यात 7 महिन्यांनंतर मोहम्मद मोईजोद्दीन मोहम्मद सलीमोद्दीन (47) यास पोलिसांनी 12 एप्रिल रोजी अटक केली होती. 12 एप्रिल ते 15 एप्रिल आणि पुन्हा 15 ते 16

धर्मपाल शाहू आणि ज्ञानोबा सुर्यवंशी यांना पोलिस कोठडी

संस्थेच्या निराधार, निराश्रीत बालकांचे अनुदान देण्यासाठी 25 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या महिला व बालविकास अधिकाऱ्यासह त्याच्या वाहन चालकाला चौथे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी 1 दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे. काल दि. 15 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास नांदेडचे महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल पोतन्ना शाहू (56) आणि महिला व बालविकास कार्यालयाचा वाहन चालक ज्ञानोबा

जीवघेणा हल्ला, खून प्रकरणातील दोन युवकांची पोलिस कोठडी वाढली

मुसलमानवाडी येथे जिवघेणा हल्ला आणि कौठा परिसरात खून करणाऱ्या दोन युवकांची पोलिस कोठडी पहिल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 19 एप्रिल, 3 दिवस वाढविली आहे. दि. 8 एप्रिल रोजी मुसलमानवाडी येथे गाडी क्र. एम.एच. 26 ए.एफ. 2388 मध्ये प्रवास करणऱ्या डॉ. सतिष गायकवाड यांच्यावर जिवघेणा हल्ला करून पळून गेलेल्या दोन युवकांना पुढे कौठा परिसरात गाडी क्र. एम.एच. 24