गांधीनगरातील मातीचे ढिगारे काढण्याची मागणी

शहरातील वार्ड क्रमांक 17 अंतर्गत येणाऱ्या गांधीनगरातील पु. साने गुरूजी प्राथमिक विद्यालया समोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात असलेल्या मातीचे ढिगारे इतरत्र हलवण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे. तब्बल तीन महिन्यांपासून सदरील मोठ-मोठे मातीचे ढिगारे टाकलेले आहेत. या ढिगाऱ्यात विटांचे तुकडे, सिमेंट, रेतीचे धुळीकण आहेत. या ढिगाऱ्यांमुळे या भागातील विद्यार्थ्यांना खेळ खेळणे बंद झालेले आहे. मुलांना मोकळेपणाने

पेप्सी विकणाऱ्या दत्ताचे वही-पेन वाटप करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

पेप्सी विकून उदरनिर्वाह… आलेल्या पैशात घेऊनच घर संसार चालवायचा उन्हातानात गावागावांत भटकंती .., त्यातूनच पै पैका जमा करणारा लोह्यातील दत्ता गजानन पलये या मजुराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त 1000 वह्या व 1000 रुपये मिरवणुकीतील वाटप केल्या दारूच्या व्यवसायातून बाहेर पडावे अन्य बाबासाहेबांची शिकवण अंगीकारावी अशी तळमळ दत्ता यांची उद्धरली कोटी कुळे भिमातुझ्या

मुक्त व निर्भय वातावरणातील मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांचे पथसंचलन

15-हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहून गुरूवारी होणार्‍या मतदानादरम्यान शहराच्या कोणत्याही भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि मुक्त व निर्भय वातावरणात मतदान पार पडावे यासाठी मंगळवारी (दि.16) शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्या नेतृत्वात मतदान

नियंत्रण कक्षाची स्थापना

राज्यातील हिंगोली लोकसभा मतदार संघातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनामध्ये कार्यरत मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने सुविधाकार तथा मुख्य समन्वयक एस. के. भंडारवार यांच्या अधिपत्याखालील

लोह्यात अर्थमंत्री मुनगंटीवार यांची वटटमवार निवासस्थानी भेट

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी लोह्याचे माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांचा भव्य ह्र्दयसत्कार करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार व माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार हे व्याही आहेत. २००९ च्या लोकसभा व देशाचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व देशाचे तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे किरण वटटमवार यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. आ.

हिंगोलीत तपासणी पथकाने केली एक कोटीची रक्कम हस्तगत

दि.१८ रोजी मतदान होणार असून, आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. याच दरम्यान आज दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी हिवरा पाटी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील बैठे तपासणी पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली सदर रक्कम वाहन क्रमांक एम एच 38 80 82 या वाहनातून नांदेड करून हिंगोलीच्या दिशेने नेली जात होती.

लोकसभा निवडणूक 2019 राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येणारे राज्य शासनाचे मुखपत्र ‘लोकराज्य’ मासिक ‘लोकसभा निवडणूक 2019 राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज’ या विशेषांकाचे प्रकाशन निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेशकुमार, खर्च निवडणूक निरिक्षक एस.एम. सुरेंद्रनाथ, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, अप्पर पोलिस

‘सी-व्हिजिल’ॲप:नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा…!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक

मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करा – निवडणूक निरिक्षक डॉ. जे. रवीशंकर

हिंगोली लोकसभा मतदार संघ निवडणूक मतदान दूसऱ्या टप्प्यात होणार आहे. मतदारांकरीता मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. परंतू अजूनही मतदार संघातील काही मतदान केंद्रावर मतदारांकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असून, सदर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश निवडणूक निरिक्षक (सामान्य) डॉ. जे. रवीशंकर यांनी दिले आहे. हिंगोली

नवा कौठा ते जुनाकौठा दुतर्फी स्ट्रीट लाईट मुळे परिसर चकाकला

नवीन नांदेड जुना कौठा ते नवीन कौठा ,दुतर्फा स्ट्रीट लाईट मनपाच्या वतीने बसविण्यात आल्यानंतर काल संध्याकाळ पासून एल ई डी लाईट सुरु झाल्या मुळे हा परिसर चकाकून गेला ,या मुख्य रोडने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नियोजित सभेच्या स्थळी आगमन झाले ,या एलईडी लाईट मुळे सिडकोसह शहरात येजा करणाऱ्या वाहन धारकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला. नांदेड