पंतप्रधानाच्या वाहन ताफ्यात आपली गाडी घुसवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अपयशी प्रयत्न

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना त्यांच्या वाहन ताफ्यातील नियमांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली गाडी त्या ताफ्यात घुसवण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न पाहता एकीकडे माणुस कितीही मोठा असला तरी दुसरीकडे त्याची किंमत शुन्य असते, याची जाणिव अनेकांना झाली. महाराष्ट्र स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नंबर एकचे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख संख्या