दिव्यांग मतदार कु.अस्मिताने पहिल्यांदा मतदानाचा हकक बजावला

नांदेड येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील शासकीय अध्यापक विद्यालयातील मतदान केंद्रात दिव्यांग मतदार कु.अस्मिता बापूराव दासरी या दिव्यांग मतदाराने प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रावर तीनचाकी सायकलची सोय उपलब्ध करून दिली होती. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार दिव्यांगांची प्रथमच विशेष बाब म्हणून नोंदणी करण्यात आली असल्याचे पालक बापू दासरी यांनी सांगितले. कु.अस्मिता बापूराव दासरी

पहिल्यांदाच दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालविले मतदान केंद्र

नांदेड लोकसभा मतदारसंघात पहिल्‍यांदाच दिव्‍यांग कर्मचा-यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कला मंदिर जवळील नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये दिव्‍यांगानी मतदान केंद्र चालवले. या मतदान केद्रांत दिव्‍यांग कर्मचारी एस. एस. मठपती, गणेश रायेवार, किशन केने, तुकाराम सुर्यवंशी , बाबुराव मोरे, व्‍यंकटी मुंडे, गणपत शिरसाठ, अशोक सोळंके, तुषार कुलकर्णी, पदृमिनी कासेवाड, आश्विनी केंद्रे, आदी कर्मचा-यांनी

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडका

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अचानक वातावरणात बदल झाला यामध्ये दि. 15 रोज सोमवारी सायंकाळी 5 च्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या झरी बरसल्या. तर दि.16 रोज मंगळवारी वादळी वाऱ्यासह वीजेच्या कडकडाटात पुन्हा पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील वातावरणातील बदलामुुळे उकाडा वाढला आहे. सोमवारी सायंकाळी 4 च्यानंतर नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या

फिल्टरच्या पाण्यामुळे माठ व्यवसाय अडचणीत

जारच्या पाण्याने केली गरिबांच्या फ्रीजवर मात ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटली बंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील गावागावात पारंपारिक माठ विक्रीच्या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहज गत्या शुद्ध पाणी मिळते, शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रीज

मेहंदी स्पर्धेतून मुलींनी दिला मतदानवाढीचा संदेश

नुकत्याच झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात केवळ ५६ टक्के मतदान झाले. विदर्भातील सात मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी फारशी समाधानकारक नाही.त्यामुळे मतदान जनजागृती जोर पकडणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ तारखेला असून नांदेड लोकसभा मतदारसंघातील ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ अंतर्गत जवळ देशमुख येथे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घाटकर यांच्या

लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन

निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देणाऱ्या तसेच मतदार व उमेदवारांसोबतच अभ्यासक, विश्लेषकांना मार्गदर्शक ठरणा-या लोकराज्यच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी यांचे कक्षात करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, माहिती अधिकारी श्रीमती मीरा ढास, मीडिया कक्ष प्रमुख राजेंद्र चव्हाण, डॉ. दीपक

डांबर घोटाळ्यातील अखेरचा कंत्राटदार तीन दिवस पोलीस कोठडीत

सात महिन्यापासून 11 कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या डांबर घोटाळ्यातील फरार असलेल्या शेेवटच्या आरोपीला पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके यांनी मोठ्या शिताफिने अटक करून अत्यंत जलदगतीने न्यायालयात हजर केल्यानंतर चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.गवळी यांनी डांबर घोटाळ्याचा आरोपी असणाऱ्या शेवटच्या कंत्राटदाराला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. तीन सप्टेंबर 2018 रोजी दाखल झालेल्या डांबर घोटाळा प्रकरणात मनोज मोरे, भास्कर

पंतप्रधानाच्या वाहन ताफ्यात आपली गाडी घुसवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अपयशी प्रयत्न

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना त्यांच्या वाहन ताफ्यातील नियमांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली गाडी त्या ताफ्यात घुसवण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न पाहता एकीकडे माणुस कितीही मोठा असला तरी दुसरीकडे त्याची किंमत शुन्य असते, याची जाणिव अनेकांना झाली. महाराष्ट्र स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नंबर एकचे व्यक्ती आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख संख्या

नादुरुस्त ‘वाल’मुळे रस्त्यावर वाहतेय हजारो लिटर पाणी..!

पाणीटंचाईच्या काळात माहूर न.पं. कडून पाण्याची नासाडी माहूर शहरात नगर पंचायत कार्यालया च्या ढिसाळ नियोजना मुळे शहरातील नागरिकांना कृतीम पाणी टंचाई चा फटका बसत असून शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या पैनगंगा नदीत विदर्भातील वेणी धरणाचे पाणी आल्याने कोल्हापुरी बंधारा भरलेला असताना देखील सुद्धा नियोजनाचा अभाव असल्याने मागील महिन्याभरापासून माहूर शहरात नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत

‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त टिप्स !

लोकसभा निवडणूक आयोगासह उमेदवार, आणि विविध राजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूक विषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यम वापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’ या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोकसभा