अगोदर मतदान…नंतर वारी..मतदान करण्यासाठी असाही संकल्प

मुखेड तालुक्यातील अनेक नागरीक चंद्रपुर येथील महाकाली देवीच्या दर्शनासाठी गाडया बांधून जात असतात. पोर्णिमा दि. 19 रोजी आल्यामुळे मागील चार ते पाच दिवसापुर्वी अनेक नागरीक गाडया बांधुन रवाना सुध्दा झाले पण शहरातील डोईजड परिवारातील सदस्यांनी अगोदर मतदान करण्याचा निर्धार केला. सकाळी 8 वाजता डोईजड, कुंभारकर, घोगरे परिवारातील सदस्यांनी आपल्या परिवारासह मतदान केले अन नंतरच चंद्रपुर

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार

नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानानंतर सर्वत्र आकडेमोड करायला सुरुवात केली असून, या निवडणुकीचा निकाल दि.२३ में रोजी जाहीर होणार असल्याने उमेदवारांच्या काळजाचे ठोके आणि कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्नीसह केले मतदान

नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा नांदेडचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये चव्हाण मोठे परिश्रम घ्यावे लागले असून, भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा सभामुळे त्यांच्यासह कार्यकर्त्यांची दमछाक झाली आहे. असे असताना त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरांसह बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार भिंगे यांच्याही तंगड्या प्रचाराचा समान

प्रा.यशपाल भिंगे यांनी सपत्नीक मतदान केले

एड.बाळासाहेब आंबेडकर व बै. असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित आघाडीचे नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा.यशपाल भिंगे यांनी सपत्नीक मतदान केले. प्रचाराच्या दरम्यान बाबासाहेबांच्या अनुयायासह मुस्लिम समाजाचाही मोठा प्रतिसाद दिसल्यामुळे भिंगे याना मोठ्या प्रमाणात मतदान मिळेल अशी खात्री आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये भिंगे हेच नांदेड लोकसभेचा खासदार निवडीचे शिल्पकार ठरणार असून, या ठिकाणी होणाऱ्या तिरंगी लढतीत

आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज देशहितासाठी केले मतदान

नांदेड लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार तथा लोहा – कंधारचे आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज देशहितासाठी आणि प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी याना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष नांदेडच्या निवडणुकीकडे लागले असून, या ठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासादर तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आहेत. त्यांना हरविण्यासाठी नांदेडमध्ये प्रधानमंत्री,

आ.हेमंत पाटील यांनी देखील सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार तथा नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील यांनी देखील सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला नांदेडमध्ये सकाळीच सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदार संघात खरी लढत शिवसेना – काँग्रेस या दोघामध्येच होणार असून, बहुजन वंचित आघडी आणि गोरसेनेच्या उमेदवारावर या दोघांपैकी एकाच्या विजयाची डोर आहे. प्रचारादरम्यान मतदार संघा बाहेरचा उमेदवार आणि मतदार

आमदार बच्चूभाऊ कडू यांनी केलं मतदान

अचलपूर मतदारसंघातील लोकप्रिय तथा शेतकरी अपंगांच्या प्रशांसाठी अधिवेशन गाजवून सोडणारे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या मुळगाव बेलोरा येथे सपत्नीक मतदान करून हक्क बजावला…. आणि सर्वानी देखील मतदानाचा अधिकार वाजवावा असे आवाहन केले.

काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी अर्धांगिनीसह मतदान केले

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आपल्या मूळगाव मौजे ल्याहारी येथे अर्धांगिनी सौ.अनिता सुभाष वानखेडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चेहऱ्यावरील भावमुद्रा विजयाची खात्री असल्याचे दर्शवित असली तरी त्यांचा सामना शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याशी असल्याने कोण विजयी होईल हे पाहण्यासाठी २३ में च्या निकालाची वाट पाहवी लागणार आहे.

गुजरात राज्याचे प्रभारी राजीव सातव यांचे सपत्नीक मतदान

हिंगोली लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे माजी खा.तथा गुजरात राज्याचे प्रभारी राजीव सातव यांनी देखील मसोड ता.कळमनुरी, जी.हिंगोली येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रहितासाठी सर्वानी मतदान हक्क बजवावा असे आवाहन करून, माझे मत विकासासाठी…, माझे मत देशाच्या उज्वल भवितव्यासाठी…, माझे मत युवकांसाठी…, माझे मत लोकशाहीच्या सबलीकरणासाठी…, माझे मत लोक कल्याणकारी राज्यासाठी… असंल्याचे सांगितले आहे.

शासकीय धान्य गोदाम डॉ. बाबासाहेबाना अभिवादन

शासकीय धान्य गोदाम हिमायतनगर येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त गोदामपाल बी. के. राऊत आणि गोदामवरील कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.