किनवट येथे श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी

शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाफ असलेल्या वायुपुत्र व श्रीरामदूत असलेल्या महाबली श्री हनुमानाची जयंती आज चैत्र पौर्णिमा रोज शुक्रवारी सूर्योदयकाली किनवट शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आली. मुख्य हनुमानमंदीराचे विश्वस्त तथा सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र चाडावार यांनी दरवर्षी प्रमाणे ब्राह्ममुहूर्तावर श्री हनुमानाची षोडशोपचार पूजा व रुद्राचा महाभिषेक करून अग्रपूजेचा मान मिळविला. त्यानंतर

हनुमान जयंतीनिमित्त मारोतीरायाच्या दर्शनासाठी बोरगडीत भक्तांची तोबागर्दी

लाखो भाविक – भक्तांनी घेतले दर्शन … चैत्र शुद्ध १५ रोजी आलेल्या हनुमान जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारुतीरायाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य यात्रा उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आदींसह विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून, उद्या दि २० रोजी भव्य कुस्त्याच्या दंगलीने यात्रेचा समारोप केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी

पळसपुर येथे हनुमान जयंतीपर्वावर अष्टविनायक मूर्ती प्राणप्रतिष्ठापना

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे आज दि.19 रोजी सकाळी ठीक सात वाजल्यापासून हनुमान जयंतीच्या महापर्वावर हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये श्री अष्टविनायक गणपती मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली असून, तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासून अभिषेक महापूजा आदी कार्यक्रम संपन्न झाली आहे. या कार्यक्रम सोहळ्यामध्ये महायज्ञाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमांमध्ये पळसपुर येथील चार जोडप्यांनी महायज्ञाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.

सिडकोत भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

नवीन नांदेड सिडको हडको परिसरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मंदिरात जयंती निमित्य विविध कार्यक्रमासह महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती निमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली जैन मंदिर ज्ञानेश्वर नगर येथुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. ती मुख्य मार्गाने हडको बसस्थानक ते एन डी ४१ मार्ग

संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

अनेक संत महात्मे यांच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नांदेड समाज संप्रदायाने मिळून विविध सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकारी विश्वस्त मंडळ कार्यकारिणी सदस्य जैन श्रावक. श्राविका .यांच्या बहुसंख्य उपस्थितीमध्ये नांदेड शहराच्या अतिप्राचीन दिगंबर जैन अतिशय क्षेत्र श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर सराफा इथून सर्वप्रथम भगवान महावीर जन्म कल्याणक नुसार संपन्न झाल्यावर भव्य शोभा.यात्रेचा प्रारंभ करण्यात

चंद्रपुरच्या महाकाली यात्रेमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता ?

भाविकांचे श्रद्धा स्थान चंद्रपुरची महाकाली या देवीची यात्रा आता कांही दिवसावार येवुन ठेपली आहे.आता पासुनच या देवीच्या दर्शनासाठी जाण्याची तयारी भाविक भक्तानी सुरु केली असुन या यात्रे साठी बिलोली तालुक्यातुन जाणाऱ्या भाविकांची संख्या व मतदानाची तारीख हे लक्षात घेता या लोकसभा निवडूनकीतील मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतो की काय ? अशी शंका तालुक्यात व विशेषतः राजकीय

राहुरी कृषि विद्यापीठात फुले जयंती महोत्सव

साहित्यिक देवीदास फुलारींनी घेतला फुल्यांच्या ग्रंथांचा मागोवा आजचे सभोवतालचे वातावरण खूपच अस्वस्थ करणारे आहे. आजचा तथाकथित प्रगत समाज जातीधर्मात विभागला जात आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांचे मानवतेचे विचार आजही मार्गदर्शक असून त्यांनी सूचवलेला मानवता धर्म आजच्या मानवी वृत्ती-प्रवृत्तीत यायला हवा. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. मानवी

अभिजीत आपस्तंब आणि सौ. सारिका पांडेच्या गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

कैलास नगर जागृत हनुमान मंदिर दि. 18 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी 7 वाजता वाजता जागृत हनुमान मंदिर, कैलास नगर, नांदेड येथील प्रसिद्ध गायक अभिजीत रत्नाकर आपस्तंब आणि प्रसिद्ध गायिका सौ. सारिका पांडे यांच्या ‘गीतरामायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. ग.दि. माडगूळकर आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांनी अजरामर केलेली कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण’

भग्न झालेल्या शिवलिंगाच्या ठिकाणी नवीन शिवलिंग स्थापनेची जय्यत तयारी

साधू महंत आणि शिवभक्तांच्या मागणीवरून मंदिर कमिटीचा ठराव मुर्त्यांची शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमायतनगर येथील जाज्वल्य श्री परमेश्वर मंदिरामधील भग्न झालेल्या शिवलिंगाच्या ठिकाणी आता नवीन मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी तामिळनाडू राज्यातून भव्य अशी मूर्ती आणण्यात आली असून, मूर्ती स्थापनेच्या कार्याकामाची तयारी मंदिर कमेटीकडून केली जात आहे. विदर्भ, मराठवाडा, तेलंगणरा, अंधरप्रदेशासह कर्नाटक राज्यापर्यंत ख्यातीप्राप्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती

नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 128 वी जयंती नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री बी. विश्वनाथ ईर्या, अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक, नांदेड यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सोबतच श्री विलास मुंगे, विभागीय सचिव, ऑल इंडिया एस.सी. एंड एस.टी.