आधी मतदान करून वर्हाडी मंडळींसह वधू – वर लग्नासाठी रवाना…

नवीन नांदेड कौठा येथील नरोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या माने – जाधव परिवाराने लग्ना अगोदर तब्बल २८४ वर्हाडी मंडळी सोबत नियोजित वधू – वर यांनी मतदान करुनच किनवट येथे होणाऱ्या शुभ विवाहास रवाना झाले. या परिवाराने नियोजित शुभ विवाहाची वेळ बदलून अगोदर मतदान नंतरच लग्न हा वेगळा आर्दश समाजापुढे ठेवला, यासाठी समाजातील व परिवारातील सदस्यांसह

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती

नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 128 वी जयंती नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री बी. विश्वनाथ ईर्या, अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक, नांदेड यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सोबतच श्री विलास मुंगे, विभागीय सचिव, ऑल इंडिया एस.सी. एंड एस.टी.

मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा: शाईनडॉटकॉम

पहिले उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षण२० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची मुंबईकरांना अपेक्षा आर्थिक राजधानी मुंबईत काम करणा-या कर्मचा-यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे तर तर त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचा-यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल असे वाटते आहे. शाईनडॉटकॉम या भारतातील दुस-या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जॉब पोर्टलने अलीकडेच केलेल्या पहिल्यावहिल्या उमेदवार-केंद्री

सिडको परिसरात डॉ बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी

मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप नवीन नांदेड सिडको परिसरात डॉ बाबासाहेब जयंती उत्साहात साजरी ,मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले तर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत १३जयंती मंडळाची नोंद करण्यात आलीहोती शहरी भागात १०तर ग्रामीण भागात ३जयंती मंडळांनी नोंद केली असून जयंती निमित्य कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला

श्रीनिकेतन शाळेत महामानवाला अभिवादन

नांदेड शहरातील दिपकनगर भागात असलेल्या श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मूख्याध्यापिका डॉ. सौ. एस.एन.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्या आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक के.आर. बनसरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जयंती निमित्त पुस्तकरूपी अभिवादन

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रा मार्फत व दै.लोकपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 एप्रिल रोजी नांदेड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ग्रंथदान अभियान राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्यावतीने गेल्या अनेक दिवसापासून ग्रंथदान अभियान राबविले जात आहे. या अध्यासन केंद्राचे मोठ्या प्रमाणात ग्रंथ गोळा करण्याचे अभियान जोमाने

किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज रविवारी (दि.१४) किनवट, गोकुंदा व परिसरात अत्यंत हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. जयंतीचा मुख्य सोहळा सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके व फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे- संगमेश्वर लांडगे

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने बाबासाहेबांना आभिवादन मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे हे होते तर प्रमुख उपस्थिती टर्निंग पॉइंट अभ्यासिकेचे संचालक बाळासाहेब देसाई, संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष अशोक कदम यांची होती.

कंबोडिया अंग्कोरवाट येथे रंगणार

नवव्या विश्व साहित्य संमेलनाचा सोहळा विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित नववे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडिया अंग्कोरवाट येथे होणार असून ते दि. 28 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी शनिवारी दि. 13 एप्रिल 2019 रोजी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या प्रसंगी माधवी वैद्य, राजेंद्र गुंड उपस्थित

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्‍त भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन

जिल्‍हा परिषद अधिकारी व कर्मचारी भिम जयंती मंडळाच्‍या वतीने आज रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी जिल्‍हा परिषदेत विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता होणा-या अभिवादन सोहळयाप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्‍हा ग्रामीण