निवडणुकीची धामधूम संपताच; प्रणीताताई पाणी फाउंडेशन’च्या श्रमदानात सक्रीय !

वीस – पंचवीस दिवसाच्या अहोरात्र धामधूमीनंतर विश्रांतीला फाटा देत जि.प. सदस्या प्रणीताताई देवरे –चिखलीकर या पाणी फाउंडेशन’मध्ये सक्रीय झाल्या आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच गुंडेवाडी येथे श्रमदान केले तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.नांदेड लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील उमेदवार होते वडिलांच्या प्रचारार्थ जि.प. सदस्या प्रणीताताई देवरे यांनी संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रात किमान तीनशे सव्वा तिनशे गावात भेटी

नांदेड जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे मंदावली

राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सर्वप्रथम राज्य शासनाने शाश्वत सिंचनावर अधिकचा भर दिला होता. यावर जलयुक्त हे अभियान हाती घेतले. या अभियानातून मागील तीन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे राबविण्यात आली. मात्र मागील 2018 आणि 2019 या वर्षांत जलयुक्त शिवार कामे मंदावल्याचे दिसून येत आहे. विशेषत: यावर्षी ही कामे प्रामुख्याने कुठेही होत असताना दिसून येत नाहीत.

जिल्ह्याच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

12 तालुक्यात घट तर 4 तालुक्यात किंचीत वाढ जिल्ह्याच्या पाणी पातळीची तपासणी जिल्हा भुजल संरक्षण विभागाकडून वर्षातून 4 वेळा केली जाते. यात मार्च अखेरपर्यंत जिल्ह्याच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये 12 तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी घट झाली आहे तर उर्वरी ीत 4 तालुक्यात कंचित वाढ झाल्याची अकडेवारी समोर आली आहे.

बिबट्याच्या धुमाकुळाने डोल्हारीच्या खालील भागात पैनगंगेला आले पाणी

काही गावांचा तात्पुरता पाणीप्रश्न सुटला…तर नदीकाठावरील बहुतांश गाव टंचाईच्या सावटामध्ये विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या चार महिन्यापासुन कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठच्या गावांत पाण्याचा ठणठणाठ झाला होता. यामुळे जनावरासह वन्य प्राण्याना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तसेच नदीपालीकडे असलेल्या अभयारण्यातील वन्य प्राणी बिबट्यासह इतर प्राण्यांनी वारंगटाकळी भागात शिरकाव करून धुमाकूळ घालून तिन जनावरे

पैनगंगा नदी कोरडी पडल्याने चारा – पाणी टंचाईची भीषणता वाढली

इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी तीन महिन्यापासून कोरडी ठाक पडल्याने नदी काठावरील गावासह जनावरांच्या चारा आणि पाण्याची भीषणता वाढली आहे. हि बाब लक्षात घेत इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम यांच्यासह नदीकाठावरील

शेतकऱ्यांनी बंद पाडली हळद खरेदीचे व्यवहार

शेतकऱ्यांचे कापसानंतर हळद पीक हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते. मागील तीन वर्षांच्या काळात यावर्षी हळदीचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे. सध्या विक्रीसाठी नवा मोंढा येथे बाजारपेठेत हळद आली आहे. मात्र खरेदीदारांकडून बिट (बोली)च्या माध्यमातून खरेदी न करता शेतकऱ्यांची मोंढा परिसराच्या बाहेर कमी भावाने हळद खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी दि. 8 रोज सोमवारी