हिमायतनगरात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

तर खडकीमध्ये तरुणीची छेडछाड

हिमायतनगर पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील फुले नगर येथील एका 8 वर्षीय बालिकेवर विवाहित तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली असून, दुसरी एक घटना तालुक्यातील बा. खडकी येथिल शाळकरी अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, दोन्हीही आरोपीना अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुले नगर येथील विवाहित आरोपी बालाजी देवकते याने दि. १६ मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून घराशेजारील एका खड्यात नेऊन छेडछाड केलं. तसेच जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीने याची माहिती घरच्यांना दिली, त्यांनी याबाबत हिमायतनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून सदर आरोपीवर कलम ३७६ अ ब भादवि व पॉस्को कायदा कलम ४,६, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तात्काळ अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

तसेच तालुक्यातील मौजे खडकी बा.येथील एका १३ वर्षीय बालिकाचा वारंवार वाईट हेतून पाठपुरावा करून हात धरून ओढून छेडखानी केली. हा प्रकार मागील एक महिन्यापासून सुरु असल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतरही वेळुवेलो तिचा पाठलाग करत शाळेत जाऊन हाक मारून, शाळेत जाताना फोटो कडून त्रास दिला. तसेच फिर्यादी अल्पवयीन मुलीस तिच्या वडिलांस खतम करतो अशी धमकी देऊन लज्जा वाटेल असे हाव भाव इशारे करून त्रास दिल्यामुळे ट्रस्ट पीडित मुलीने याबाबतची तक्रार पोलिसांना दिली. त्यावरून टवाळखोर्या करून मुलींना त्रास दिल्या प्रकरणी आरोपी कपिल संभाजी गाडे रा.खडकी बा. याच्यावर पॉस्को काद्यांतर्गत गुन्हा दाखल ककरण्यात आला आहे. सदर आरोपीला अटक केल्यानंतर माँ.न्यायाधीश साहेबांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी दिली.

You may also like

Popular News