लकडोबा चौक ते नांदेड – किनवट रस्त्याचे कोट्यवधींचे काम थातुर – मातुर

शहरातील ३ कोटीतील कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह…
तक्रारीमुळे निकृष्ठ आणि बोगस कामाचे पितळे उघडे….

हिमायतनगर शहरात गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या विविध विकास कामाचे तीनतेरा वाजले असून, होत असलेल्या कामाची गुणवत्ता ढासळल्याने अल्पावधीतच रस्ते पुन्हा मातीत मिसळण्याची शकयता बळावली आहे. असेच थातुर – मातुर काम लकडोबा चौक ते नांदेड – किनवट रस्त्याकडील रस्त्याचे केले जात असून, याची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर दंडात्मक कार्यवाही करून सदरचे कंत्राट रद्द करावे आणि दर्जेदार काम करणारी एजन्सीला काम देऊन मजबूत रस्ता करून घ्यावा अशी मागणी अनेकांनी तक्रारी देऊन केली आहे. त्यामुळे नगरपंचायतीकडून होत आलेल्या निकृष्ठ आणि बोगस कामाचे पितळे उघडे पडले असून, तात्काळ रस्त्याच्या कामाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करावी. नाहीतर या संदर्भात पत्रकार संघटनेचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेणार असून, वेळ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याची तयारी केली असल्याची माहिती मराठी पत्रकार संघटनेचे सचिव दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, नुकतेच येथील नगरपंचातीअंतर्गत १२ कोटी रुपयाच्या निधीतून विविध विकास कामाचे उदघाटन आमदार महोदयांनी करून संबंधित गुत्तेदारास दर्जेदार रस्ते निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या. उदघाटनाची वेळी गुत्तेदारासह संबंधित अभियंत्यांनी मान हलवून हमी दिली, मात्र प्रत्यक्षात शहरात सुरु असलेल्या वॉर्ड क्रमांक ०१ मधील बाबूराव चवरे ते नितीन मुधोळकर याच्या घरापर्यंत आरसीसी रस्ता व नालीचा बांधकाम, वॉर्ड क्रमांक १७ मधील नांदेड -किनवट रोड ते रेल्वे स्टेशन पर्यंत आरसीसी रस्ता व नालीचा बांधकाम, वॉर्ड क्रमांक ११ मधील श्री परमेश्वर मंदिर रोड ते हुतात्मा जयवंतराव कॉलेज आणि हराळे सर ते वराडे सर यांच्या घरापर्यंत आरसीसी रस्ता व नालीचा बांधकाम व इतर ठिकाणीच्या कामासाठी अंदाजित ३ कोटीहून अधिकच निधी मंजूर आहे. या निधूतन सुरु असलेल्या कामावर माती मिश्रित रेती, सिमेंटचा कमी प्रमाणात वापर आणि, रस्त्याच्या बेडमध्ये टोळके दगड टाकून थातुर – माथूर पद्धतीने कामे केली जात आहेत. या रस्त्याच्या कामाच्या मजबुतीकरणासाठी पाणी टाकून क्युरिंग केली जात नसल्याने आणि अगोदर डोजरने पाणी टाकून दबाई न करताच थातुर – मातुर रस्ता करून गुत्तेदार अभियंता, मुख्याधिकारी व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मिलीभगत करवून देयके उचलण्याच्या प्रयत्नात आहेत. एव्हडेच नव्हे तर वॉर्ड क्रमांक ११ आणि १३ च्या मध्यभागी असलेल्या लकडोबा चौक ते नांदेड- किनवट रोडपर्यंतच्या रस्त्यासाठी ७४ लक्ष ६२ हजार ३५९ रुपयाच्या आणि आरसीसी नाली बांधकामासाठी ३२ लक्ष २८ हजार २८४ रुपयांचा निधी मंजूर असताना सदरचे काम बोगस पद्धतीने करून कोटीचे काम काही लाखामध्ये करून आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न चालविला जात आहे.

खरे पाहता अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे खोदकाम जेसीबीने करून अगोदर रस्त्याचं मजबुतीकरण तसेच दोन्ही साईडच्या नाल्याचे बांधकाम करणे क्रमप्राप्त आहे. असे असताना देखील केवळ जुन्या सिमेंट रस्त्याच्या साईडने दगड टाकून त्याचा रस्त्यावर सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्याचा प्रकार स्माबंधित गुत्तेदाराकडून चालविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच नालीच्या कामातही हलगर्जीपणा दाखवीत थुक्का – पॉलिश लावून शासनाकडून उपलब्ध हलेल्या निधीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न संबंधित अभियंत्याच्या माध्यमातून चालविला जात आहे. खरे पाहता हिमायतनगर येथे शासकीय कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त आलेल्या अभियंत्याने अद्यापही भेट दिली नसून, त्यांच्या नावाखाली रोजनदारीवरील प्रभारी अभियंता साईटवर उपस्थित होऊन शहरवासियांच्या डोळ्यात धूळफेक करून मार्च एंडपूर्वी रस्त्याचे कामे करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरु झाला आहे. सदरच्या कामाची गुणवत्ता लक्षात अनेकांनी या रस्त्यासह इतर कामाच्या तक्रारी केल्या असून, तरीदेखील तक्रारकर्त्यांना मैनेज करून ३ कोटीच्या निधीतील रस्त्याचे कामे निकृष्ट दर्जाचे करून निधी उचलण्याचा प्रयत्न सबांधिताकडून चालविला जात आहे. या प्रकाराकडे नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, आमदार व मुख्याधिकारी यांनी लक्ष देऊन सदर कामाची उच्चस्तरीय चौकशीसाठी विशेष पथक नेमावे. आणि औरन्गाबाद येथील गुणनियंत्रण मापक मशीनद्वारे कामाच्या गुणवत्तेची तपासणी करूनच नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या ३ कोटीच्या आरसीसी रस्ते आणि नाली बांधकामाचे देयके काढण्यात येऊ नयेत अशी मागणीही निवेदनाद्वारे काही सामाजिक संघटनांनी केली आहे.

You may also like

Popular News