वोट करेगा, वोट करेगा… सारा नांदेड वोट करेगा…

या घोषवाक्यांनी नांदेड शहर दुमदुमले

नांदेड जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्यासाठी देणाऱ्या सरकारची निर्मिती आपल्या मताने होते, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची नांदेड शहरातून वॉक फॉर वोट (पदयात्रा) काढण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी 7- वाजता जुना मोंढा येथून पदयात्रेला सुरुवात झाली.

वोट करेगा, वोट करेगा… सारा नांदेड वोट करेगा…, छोडकर सारे काम-चलो करे मतदान, सर्वांची आहे, ही जबाबदारी मत देणार सर्व नर-नारी, निर्भय होवून मतदान करा-देशाचा सन्मान करा, मतदानासाठी वेळ काढा-आपली आपली जबाबदारी पार पाडा आदि घोषवाक्यांनी नांदेड शहर दुमदुमले होते. ही पदयात्रा जूना मोंढा येथून निघून महाविर चौक, वजिराबाद, पोलीस अधीक्षक कार्यालयापासून, कलामंदिर, शिवाजी नगर मार्गे आय.टी.आय येथील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मतदान जनजागृती पदयात्रेचा समारोप करण्यात आला. जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे,यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती रथ, कलापथक, पत्रलेखन आदि स्पर्धा तसेच जिल्ह्यामध्ये सर्वत्र फिरुन मतदारांकडून मतदान करण्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वीप कक्षामार्फत काढण्यात आलेल्या लोकसभा चुनाव -2019 राष्ट्रीय महोत्सव या स्टिकर वाहनाला लावून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चित्ररथ, मतदान करण्याविषयी करण्यात येणाऱ्या घोषणांना नागरिकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला. मी मतदान करणारच हा संदेश लिहिलेल्या टोप्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले.निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी येत्या एप्रिल, रोजी मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पदयात्रेत उपस्थितांचे आभार मानले.

या पदयात्रेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जात पडताळणी समितीचे राम गगरानी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष कंदेवाड, निळकंठ पाचंगे,जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मनपाचे उपायुक्त श्रीमती गीता ठाकरे, तहसीलदार किरण आंबेकर, मिलिंद व्यवहारे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, दिलीप बनसोडे, अशोक देवकरे,धर्मपाल शाहू, रमेश मारावार, विष्णू गोडबोले, शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, मेडिकल व व्यापारी असोसिएशन, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, पत्रकार, शाळा-महाविद्यालय, स्काऊट-गाईड, एनसीसीचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रलोभ कुलकर्णी, शेख रुस्तुम, रवी ढगे, कविता जोशी, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, धिरेन आठवले, अभिजीत आदींनी पुढाकार घेतला. तालुका आणि गावोगाव अश्यात जन जागृती रॅली काढल्या जाणार आहेत. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. नांदेड न्युज लाईव्ह जनतेला आणि वाचकांना आवाहन करीत आहे की मतदान करणे हा आपला सर्वात मोठा अधिकार आहे.तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता आणि आपल्या जीवनातील महत्वपूर्ण कार्य समजून करावे तरच खऱ्या अर्थाने लोकशाही ‘दब्बर’ होणार आहे.

You may also like

Popular News