आता अवैध रेती वाहतुकीसह काळी माती, गिट्टीची वाहनेही जप्त

वाहन मालकांचा प्रशासनाच्या नावाने शिमगा

बिलोलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यातील मांजरा व गोदावरी नदी पात्रातुन रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या रेती तस्करांना सळो की पळो करुन सोडणारे येथील तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात महसुलामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत असले तरी दुसऱ्या बाजूला आता काळ्या मातीचे वाहन व गिट्टीचे वाहने जप्त केल्यामुळे वाहन धारकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावर आकारण्यात येत असलेला दंड व गुन्ह्याचे स्वरुप पाहता काही वाहन धारकावर मोठा अन्याय होत असल्याची भावना वाहन मालकामध्ये तयार झाली आहे. गौन खनिजाचे उत्खनन चोरीने करुन वाहतुक करित असलेले जर ट्रॅंक्टर असेल तर जवळपास एक लाख रुपये दंड मोठे अवजड वाहन असल्यास दोन लाख रुपयांच्या वर दंड शासनाच्या सुधारीत परिपत्रकाप्रमाणे गेल्या एक वर्षभरापासुन आकारल्या जात आहे, अशा परिस्थितीत एखादे पकडलेले ट्रॅंक्टर असेल त्यामध्ये अर्धा ब्रास किंवा एक ब्रास रेती असेल तर ते गुन्ह्याचे वर्गीकरण न करता सरळ सरळ एक लाख रुपये दंड ठोठावल्या जात आहे. यामुळे यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन शेतीत टाकण्यासाठी वाहतुक करण्यात येत असलेली काळी माती व घर बांधकामासाठी वाहतुक होणारी गिट्टी याकडे फारसे कोणी लक्ष देत नव्हते. कारण खडी कारखाण्याचा मालकच सुरवातीला प्रशासनाकडे रॉंयल्टी भरुनच गिट्टीची विक्री करत असतो असे सांगितले जाते. जर असे असेल तर गिट्टीची वाहतुक करित असलेली काही वाहने का जप्त करावे? असा प्रश्न वाहन मालक करीत आहेत.

You may also like

Popular News