शेतकऱ्यांनी बंद पाडली हळद खरेदीचे व्यवहार

शेतकऱ्यांचे कापसानंतर हळद पीक हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते. मागील तीन वर्षांच्या काळात यावर्षी हळदीचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे. सध्या विक्रीसाठी नवा मोंढा येथे बाजारपेठेत हळद आली आहे. मात्र खरेदीदारांकडून बिट (बोली)च्या माध्यमातून खरेदी न करता शेतकऱ्यांची मोंढा परिसराच्या बाहेर कमी भावाने हळद खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी दि. 8 रोज सोमवारी सुरू असलेल्या हळद खरेदीचा व्यवहार बंद पाडला.

यात सविस्तर असे की, यावर्षी हळदीचे उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिकचा कल वाढला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक शेतकरी हळद विक्रीसाठी बाजारपेठेत घेऊन येतात. हळद हे पीक नऊ महिन्यांचे आहे, शेतकऱ्यांचे नगदी पीक या पिकाकडे बघले जाते. विशेषत: या हळद पिकाच्या भरोशावर शेतकरी अनेक कामे करतो. यात महत्वाचे कामे म्हणजे घरातील मुला-मुलींचा विवाह, घरबांधणी, शेतखरेदी, देणे-घेण्यांचा व्यवहार असा महत्वाचा व्यवहार, या पिकाच्या भरोशावर शेतकरी करत असतो. कारण हळदीपासून शेतकऱ्याला किमान 1 लाख रूपयांच्यावर उत्पन्न मिळत असते. ही रक्कम एकदाच मिळत असल्याने शेतकरी कापसाबरोबरच हळद पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहतो. यावर्षी हळदीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले असल्याने नवीन मोंढा येथे आडत दुकानावर हळद विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आले आहे. दररोज 100 ते 200 टन विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे.

सध्या हळदीचे दर शेतकऱ्यांना परडणारे आहेत. सोमवारी खरेदी दाराकडून 6 हजार ते 8500 हजार रूपयांपर्यंत खरेदी केली. हळदीच्या प्रतवारीनुसार किंमतीत ठरत असतात. यात मंडा, शेेंग यांचे दर वेगवेगळे असतात.हळद खरेदी करण्यासाठी नांदेडचेच व्यापारी नसून यासाठी वसमत, सांगली बाहेर राज्यातूनही या ठिकाणी खरेदीसाठी येतात. शहरातील दैनंदिन खरेदी करणाऱ्या 10 ते 12 व्यापारी आहेत, मात्र या व्यापाऱ्यांनी संगणमत करून शेतकऱ्यांची कमी दराने हळद विक्री करण्याचा सपाटा उठवला. यात असे की, बिट न लावता शेतकऱ्यांची आडत दुकानातून हळद विक्री न करता थेट शेतातून आणलेला माल बाजार समितीच्या बाहेर आणलेला माल थांबवून 1000 ते 1500 रूपये कमी दराने भाव शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. मात्र संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दोन ते तीन व्यापाऱ्यांकडून हळदीची खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांनी ही खरेदी बंद पाडून नवीन मोंढा परिसरात जेवढे खरेदीदार आहेत त्या सर्वांनी शेतकऱ्यांचा माल संपेपर्यंत खरेदी करावा, जो भाव दैनंदिन निघेण तो भाव शेतकऱ्यांना मान्य आहे, असे म्हणत शेतकऱ्यांनी आजचा हळद खरेदीचा बाजार बंद पाडला. यामध्ये सोनाजी साळवे रा. दिग्रस, प्रकाश नरवटे रा. चोरंबा, संग्राम दगडे रा. बामणी, आनंदा कदम रा. बामणी यांच्यासह आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन हळदीची खरेदी बंद पाडली.पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांनी बिटच बोलाविले नसल्यामुळे पाडव्याच्या दिवशी हळद खरेदी झाली नाही. शेतकऱ्याला लवकरच बिट झाले असे सांगून खरेदीदार हात वर करतात. एकीकडे खरेदी करण्यासाठी व्यापारी दोन ते तीन येत असतात बाकीचे मात्र येत नाहीत, सर्व व्यापाऱ्यांनी बोलीच्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांचा माल संपेपर्यंत रहावेत अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून ऐकावयास मिळाली.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या माल संपेपर्यंत किंवा बिट संपेपर्यंत सर्व व्यापारी थांबावे, एकूण 10 व्यापारी दैनंदिन हळद खरेदीसाठी नवीन मोंढा परिसरात आहेत, मात्र केवळ दोन ते तीन व्यापाऱ्यांकडून हळद खरेदी केली जात आहेत, असे मत आडतदार दिगांबर सवडंके यांनी व्यक्त केले.

You may also like

Popular News