पंतप्रधानांचा वाहन ताफा अवघ्या 20 मिनिटातच सभास्थळी पोहचला

पोलीस विभागाचे उत्कृष्ट नियोजन झाले यशस्वी
17 किलो मीटरचे अंतर

पंतप्रधान यांच्या सभेचे नियोजन, सुरक्षा आणि त्यांना विमानतळ ते सभास्थळ घेऊन येणे आणि परत विमानतळावर नेणे या सर्व कामांमध्ये पोलीसांनी न झोपता घेतलेल्या मेहनतीमुळेच सर्व कांही उत्कृष्ट घडले आणि कोणतीही समस्या समोर आली नाही. या कार्यक्रमात अनेक कामे नांदेड ग्रामीण पोलीसांनी करायला हवी होती. पण ती जबाबदारी सुध्दा नांदेड वाहतूक शाखेने पुर्ण करून पोलीस दलाची मान उंचावली. वाहतूक शाखा पोलीसांना शेवटच्या दोन दिवसात दोन तासच झोप मिळाली असेल असे या कामाचा आढावा घेतल्यावर दिसते.

नांदेडचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात नांदेड जिल्हा पोलीस दलासह त्यांच्या मदतीला बाहेरून आलेल्या पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच विविध राखीव पोलीस गटाच्या जवानांनी केलेली मेहनत नक्कीच वाखाणण्या जोगी आहे. सभास्थळावर पोलीसांच्या ताफा सर्वसामान्य जनतेला तेथे सहज पोहचता यावे यासाठी मेहनत घेत होते आणि त्यांच्या मेहनतीला सभा निर्विघ्नसमाप्त झाली. त्यावरून आलेले यश स्पष्टपणे दिसले. पंतप्रधान यांच्या आगमनानंतर त्यांचा वाहन ताफा सभास्थळी पोहचवणे आणि सभास्थळावरून परत त्यांना विमानतळापर्यंत आणणे हा सुध्दा एक मोठा महत्वपूर्ण कामगिरीचा भाग आहे. नांदेड वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी विमानतळ ते सभास्थळ या मार्गाची आखणी करतांना पाच वेगवेगळ्या मार्गांचा आलेख वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सादर केला. त्यातील एक मार्गाची निश्चिती झाली. पण तो मार्ग गुप्त ठेवला गेला अशीच पध्दत पंतप्रधानाच्या वाहनताफ्याच्या मार्गाची असते. पोलीसांनी तयार केलेल्या या सर्व रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मजबुतीची कामे केली. त्यामुळे नांदेडच्या रस्त्यांचे भाग्य उजळले असे वाटत होते. पण गुप्त ठेवण्यात आलेला पंतप्रधानांच्या वाहनताफ्याचा मार्ग सर्वात महत्वपूर्ण होता.

हा गुप्त मार्ग पंतप्रधानाच्या आगमनानंतर स्पष्ट झाला. तो विमानतळ- शंकरराव चव्हाण चौक- पुर्व वळण रस्ता-धनेगाव-दुधडेअरी-वाल्मिकी चौक-साईकमान-विशेष पोलीस पोलीस महानिरिक्षक कार्यालय- मामाचौक-सभास्थळ असा होता. परतीचा प्रवास सुध्दा पंतप्रधानांनी याच रस्त्यावरून केला. वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक नाईक, सय्यद रफीक, पोलीस कर्मचारी अभय जाधव, रवि राठोड आणि किर्तीकुमार कौठेकर यांनी तयार केलेल्या विविध रस्त्यांच्या आलेखातून हा रस्ता पंतप्रधानांच्या प्रवासासाठी मंजूर झाला. यापुढे याा रस्त्यावर मजबुती होणे, खड्डे बुजवणे, रिफ्लेक्टर लावणे, अर्धापूर-देगलूर-लोहा येथून येणारी जड वाहतूक पर्यायी मार्गावर पाठवणे तसेच या सर्व रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढणे या सर्व जबाबदाऱ्या वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे पार पाडल्या. या रस्त्यावरील अतिक्रमण काढणे हे काम नांदेड ग्रामीण पोलीसांनचे होते. तरीपण वाहतूक पोलीसांनी पंतप्रधानांच्या सुरक्षीत प्रवासासाठी ही सर्व कामे आपण स्वत: केली. त्यामुळे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस अधिक्षक संजय जाधव यांच्यासह इतर सर्व वरिष्ठ अधिकारी आनंदती झाले.

सायंकाळी 6.10 मिनिटाला पंतप्रधानांचे विमान नांदेड विमानतळावर उतरले. 6.17 मिनिटांना पंतप्रधानंाचा वाहन ताफा सभास्थळाकडे रवाना झाला. 6.47 वाजता सभास्थळावर पोहचला. अवघ्या 20 मिनिटात हा 17 किलो मिटरचा मार्ग वाहन ताफ्याने पार केला. परतीच्या प्रवासात 7 वाजून 50 मिनिटाला परतीच्या प्रवासावर निघालेला वाहनताफा 8 वाजून 10 मिनिटाला विमानतळावर पोहचला आणि 8 वाजून 26 मिनिटाला पंतप्रधानांचे विमान वाऱ्याच्या वेगाने दिल्लीकडे रवाना झाले. एकूणच सर्वच पोलीसांनी मिळून पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त केलेली मेहनत जोकोणी व्यक्ती पोलीसांना 6 एप्रिल रोजी पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना भेटला असेल त्यावेळी पोलीसांच्या डोळ्याला पाहून सर्वच कांही समजले असेल. कारण विचारवंत म्हणतात तुमच्या ओठातून निघाणाऱ्या शब्दांपेक्षा डोळ्यातून दिसणाऱ्या भावना जास्त बोलतात. अभिनंदन पोलीस विभागाचे.

…….रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like

Popular News