लघु आणि मध्यम उद्योगांच्या वृद्धीकरिता शॉपमॅटिकचा पुढाकार

वार्षिक ५० रु.दरात आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करण्याची दिली सुविधा

भारतातील ईकॉमर्सचा चेहरा मोहरा पालटून टाकणारे पाऊल उचलत, आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने लघु आणि मध्यम उद्योग आणि होतकरू उद्यमींना वार्षिक ५० रु.दरात आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उद्योजक आपले ऑनलाइन दुकान उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी शॉपमॅटिक मंचाच्या शक्तीशाली फीचर्सचा उपयोग करू शकतात व त्यासमोर त्यांना प्रत्येक यशस्वी विक्रीबद्दल फक्त ३% शुल्क भरावे लागेल. शॉपमॅटिकने हे ओळखले आहे की, ईकॉमर्सच्या संधींचा लाभ घेण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योजक आणि होतकरू उद्यमींना एका व्यापक मंचाचा उपयोग करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे व त्यासाठी अगोदर काही गुंतवणूक करण्याचे किंवा कमिटेड फीचे ओझे असता कामा नये. हा विचार करून या कंपनीने ही दमदार ऑफर सादर केली आहे.

शॉपमॅटिकच्या मदतीने आपला व्यवसाय ऑनलाइन सुरु करणे सोपे झाले आहे. व्यावसायिक शॉपमॅटिकअॅप डाऊनलोड करू शकतात किंवा कम्प्युटर, टॅब्लेट किंवा त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही डिव्हाईसद्वारे शॉपमॅटिक खात्यात साइन अप करू शकतात आणि काही मिनिटांतच एक ई-कॉमर्स दुकान उघडू शकतात. शॉपमॅटिकचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग अवुला म्हणाले, “आपल्या ग्राहकांना यशस्वी ई–कॉमर्स व्यवसायासाठी सक्षम बनविण्यावरच शॉपमॅटिकने आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. या लॉन्चच्या माध्यमातून शॉपमॅटिकने आपल्या ग्राहकांच्या प्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक ठळक केली आहे. आम्ही नवीन शक्यतांमध्ये गुंतवणूक करत राहू आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या ई-कॉमर्स प्रवासात मदत करू. शुल्क आणि डिव्हाईसच्या अडचणी दूर करून आम्ही ऑनलाइन विक्रीसाठी प्रतीक्षा करणार्यां ना मार्ग खुले केले आहेत.देशातील स्मार्टफोनच्या व्यापकतेचा लाभ घेऊन व त्यात आमच्या शुल्कांची लवचिकता जोडून ५००,००० ग्राहकांना येत्या १२ महिन्यात ई-कॉमर्स इकोसिस्टममध्ये सामील करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”

You may also like

Popular News