दोन सख्खे भाऊ…..पण नशीबवान तर दुसर्‍याच्या नशीबी आणखी वनवास

भाजपामध्ये दिवसरात्र काम करणारे दोन सख्खे…भाऊ एक जण मोदींजी पुन्हा पंतप्रधान बनावेत यासाठी आपला खारीचा वाटा असावा म्हणून काम धंदा, घरदार सोडून एक महिना कार्यालयात घर करणारा… तर दुसरा मोदीजी पंतप्रधान बनावे यासाठी बारा वर्षे अनवाणी फिरणारा….. दोघांची इच्छा एकच… आराध्य दैवत भाजपाच्या मोदीजींची आयुष्यात भेट व्हावी… एकाची एका दिवसात दोनदा भेट तर दुसर्‍याची मोदीजींनी बोलावल्या नंतर देखील गर्दीमुळे वेळेवर न पोंहचू शकणारा…

अ‍ॅड. दिलीप ठाकूर आणि दिपक ठाकूर हे दोघे भाऊ राजकीय-सामाजिक क्षेत्रात सतत चर्चेत असतात. पंतप्रधान मोदी यांच्या नांदेड येथील जाहीरसभे दरम्यान त्यांना भेटणार्‍या पदाधिकार्‍यांच्या यादीत दोघांची नावे दिल्ली येथील पी.एम.ओ. ऑफीसला पाठविण्यात आली. त्या यादीतील फक्त 40 जणांची पी.एम.ओ. कार्यालयाने शिफारस केली. त्यामध्ये दिलीप ठाकूर यांचे नाव आले. शिल्लक राहिलेल्या 35 पदाधिकार्‍यांमध्ये दिपकसिंह ठाकूर यांचे नाव अडकले. सभेला व्यासपीठावर जाण्यापूर्वी दिलीप ठाकूर यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. आपला परिचय देतांना दिलीप ठाकूर यांनी आपण एक महिन्यासाठी कार्यालयात राहून 24 तास काम करत असल्याचे सांगीतले. या वयात आपण करीत असलेले परिश्रम पाहून तरूणांना देखील हेवा वाटत असे सांगितल्या नंतर तुमच्या सारख्या कर्मठ कार्यकर्त्यांमुळेच मला उर्जा मिळते असे सांगितले. त्यानंतर दिलीप ठाकूर यांनी आपला छोटा भाऊ बारा वर्षांपासून आपण पंतप्रधान व्हावेत यासाठी अनवाणी फिरत असल्याचे सांगितले. त्यावर मोदींनी मी तर साडेचार वर्षापासून पंतप्रधान आहे मग तो चप्पल का घालत नाही. त्यावर दिलीप ठाकूर यांनी जोपर्यंत आपली भेट होणार नाही तो तर्यंत तो चप्पल घालणार नाही. तिन वेळेस दिल्ली मध्ये येवुन देखील आपली भेट झाली नाही असे सांगीतले. यावर मी सांगीतल्या नंतर तरी तो चप्पल घालेल का? असा प्रश्‍न मोदीजींनी केला. दिलीप ठाकूर यांनी होकार दिल्यानंतर मोदी यांनी सुरक्षा अधिकार्‍यांना दिपक ठाकूर यांना सभा संपल्यानंतर भेट करून देण्याचे आदेश दिले. सुरक्षा अधिकार्‍यांनी होकार देवून त्यांना रांगेत उभे करतो असे सांगितले. त्यानंतर मोदीजींना मी त्यांच्याशी स्वतंत्र बोलतो असे सांगीतले.

हा प्रकार दिपक ठाकूर यांच्या ध्यानीमनी नव्हता. मोदीजींची सभा ऐकत ते गर्दीत बसले होते. त्या परिसरात मोबाईल जामर लागलेला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. दिल्लीच्या सुरक्षा अधिकार्‍यांसह सर्वजण चिंतेत होते. मोदीजींची सभा संपल्यानंतर परत एकदा दिलीप ठाकूर यांना मोदीजींपुढे उभे करण्यात आले. त्यांना पाहून मोदीजी चक्क मराठीतून बोलले कुठे आहे रे तुझा भाऊ…. त्यावर दिलीप ठाकूर यांनी परिस्थिती सांगीतली. तेव्हा मोदीजींनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना औसाच्या जाहीर सभेत दिपकसिंह ठाकूर यांची भेट करून देण्यास सांगीतले आहे. यावेळी तरी दिपकसिंह यांना आपल्या तपस्येचे फळ मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may also like

Popular News