एनडीएच्या राजकारणाचा बळी ठरला नांदेडचा शीख समाज

मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावा

नांदेडच्या गुरुद्वारावर ताबा मिळवण्यासाठी शिरोमणि अकाली दल आणि शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने गलिच्छ राजकिय खेळी केली. आणि भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना राजकीय लाभ देण्यासाठी नांदेड गुरुद्वाराचा अध्यक्ष पद त्यांच्या झोळीत अलगदपणे टाकला. यासाठी नांदेडच्या शीख समाजाचा बळी देण्यात आला. अशी प्रतिक्रिया गुरुद्वारा कायदा संशोधन विरोधी आन्दोलनाचे अग्रणी कार्यकर्ता रवींद्रसिंघ मोदी यांनी येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

आपल्या प्रतिक्रियेत मोदी पुढे म्हणाले की भाजपा आणि शिरोमणि अकाली दलाने संगतमत करून नांदेड येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेच्या कायदा 1956 मधील कलम अकरा (11) चे संशोधन रद्द न करता उलट त्याचा वापर करून मुंबईच्या भूपिंदर सिंघ मिनिहास (एस. जी. पी. सी. ) यांना थेट अध्यक्ष म्हणुन नेमणूक केली. या कृत्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा, प्रकाशसिंघ बादल, सुखबीरसिंघ बादल, केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. त्यामुळे नांदेडच्या शीख समाजावर मोठा अन्याय झाला. या द्वारे दुसर्यान्दा स्थानीक शिखांचा अध्यक्ष निवडण्याचा स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आला. आता नांदेडच्या लोकसभा निवडणुकीत हेच पक्ष वारंवार गुरुद्वारा कायदातील संशोधन रद्द करण्याचे आश्वासन देउन शीख समाजाच्या जखमांवर मीठा चोळन्याचे काम करीत आहेत. नांदेडच्या शीख समाजास वेठीस धरून गुरुद्वारा कायदा संशोधनाचा विषय निवडणूक प्रचारात वापरता वेळी या पक्षाने नैतिकतेचा ही विचार करावा. कोणत्याच परिस्थितित गुरुद्वारा कायद्याची कलम अकराचे संशोधन रद्द करण्याची मानसिकता महाराष्ट्र शासनाची दिसत नाही. जर येथील शीख समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक तयारी असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीख समाजाला लेखी आश्वासन द्यावा अशी मागणी पत्रकार रवींद्र सिंघ मोदी यांनी पत्रकात केली आहे.

You may also like

Popular News