नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मालमत्ता करापोटी

३० मार्च अखेर ५ कोटीची वसुली

नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मालमत्ता करापोटी ३०मार्च अखेर ५ कोटीची वसुली झाली असून अनेक मालमता धारकाकडे येणे असलेल्या करापोटी जप्ती ची कार्यवाही करण्याच्या अगोदरच संबंधीतानी धनादेश व नगदी रकमेद्वारे भरणा करून जप्तीची कार्यवाही टाळली तर ३० मार्च रोजी मालमत्ता धारकांनी जवळपास ४२लक्ष रुपयांचा भरणा केला.

मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा मालमत्ता विभागाचे प्रमुख अजितपाल संधू सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे ,कार्यालय अधीक्षक विलास गजभारे ,कर निरीक्षक हिराचंद भुरेवार ,आरटवार,लोहगावकर ,व वसुली लिपिक दीपक पाटील ,मालू एनफळे ,मारोती सारंग ,सुखदेव जोंधळे ,भदरगे . व्यंकटी गायकवाड ,जकरीवाले ,हिमभरकर ,यांच्यासह वसुली लिपिकांनी वसुली पोटी थकबाकी मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर भरण्यासाठी सूचना केल्यातर अनेकांना जप्ती कारवाई टाळण्यासाठी नगदी रकम ,तर काही मालमत्ता धारकांकडून धनादेश स्वीकारले त्यामुळे या कार्यालया अंतर्गत जप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणावर टळली दि ३०मार्च रोजी १६ लक्ष ७७ हजाराचे धनादेश तर नगदी २५लक्ष ५४हजार अशी ऐकून ४२ लाखाची रकम जमा झाली दि ३०मार्च अखेर ५ कोटीचीरकमेच्या वर वसुली झाली आहे.

You may also like

Popular News