नवा कौठा ते जुनाकौठा दुतर्फी स्ट्रीट लाईट मुळे परिसर चकाकला

नवीन नांदेड जुना कौठा ते नवीन कौठा ,दुतर्फा स्ट्रीट लाईट मनपाच्या वतीने बसविण्यात आल्यानंतर काल संध्याकाळ पासून एल ई डी लाईट सुरु झाल्या मुळे हा परिसर चकाकून गेला ,या मुख्य रोडने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नियोजित सभेच्या स्थळी आगमन झाले ,या एलईडी लाईट मुळे सिडकोसह शहरात येजा करणाऱ्या वाहन धारकांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके कडे येथील लोकप्रतिनिधींनी स्ट्रीट लाईट बसविण्याची ची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत तात्काळ मनपाचे आयुक्त लहुराज माळी यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करत मनपा निधीअंतर्गत २० लाख २४ हजार ७४६ रुपयाच्या कामांना मंजुरी घेऊन जुना कौठा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक दुतर्फा स्ट्रीट लाईट कामाला दोन महिन्या पूर्वी प्रारंभ झाला होता या रोडवर मध्यभागी दुतर्फा पोल टाकण्यात आले व इतर कामे झाल्यानंतर त्यावर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम युद्ध पातळीवर होते . गेल्या अनेक दिवसापासून सिडको ते लातूर फाटा दुतर्फा स्ट्रीट लाईट होती परंतु पुढील प्रवासासाठी वाहन धारकांना रात्री व सकाळी अंधारमय व भयभीत होऊन प्रवास करावा लागत होता. तर सकाळी जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठीही हा भाग असुरक्षित असल्याने नागरिक लातूर फाट्यावरूनच वळून सिडकोकडे मार्गस्थ होत होते. आता पूर्णतः नांदेडला जाण्यासाठी मुख्य रोडवर स्ट्रीट लाईट झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुख्य मार्गाने नियोजित सभे च्या साठी त्यांचे आगमन होणार असल्याने तात्काळ काल सायंकाळ पासून या स्ट्रीट लाईट चालू झाली त्यामुळे हा परिसर चकाकून गेला उर्वरित नवा कौठा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर या दुतर्फी मार्गावरीलही स्ट्रीट लाईट चालू करावि अशी मागणी होत आहे.

You may also like

Popular News