ट्रक-टेम्पो अपघातात एक जण जागीच ठार

भोकर – नांदेड रोडवरील घटना

झाला.हि घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास कलदगांव पाटी जवळ घडली.

अर्धापुर तालुक्यातील कलदगांव पाटी जवळ भोकर कडून नांदेड कडे येणारा ट्रक क्र.ए.पी.16 टी ई 6639 आणि (407) टेम्पो क्र.एम.एच 26 बी 7140 यांच्यात समोरा समोर जोराची धडक होऊन टेम्पो चालक सतिश रा.इस्लापुर हा जागीच ठार झाला.सतिश हा नांदेड येथे हळद टाकून परत जात असल्याचे समजते.अपघाताची माहीती मिळताच वसमत फाटा सुरक्षा महामार्गाचे जमादार करडेवाड,संतोष भोसले,संजय,चालक रामोड यांनी टेम्पो चालक संतोष यास नांदेड येथे शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले.दरम्यान ही माहीती पोलीसांनी ईस्लापुर येथे मयताच्या नातेवाईकांना कळविल्याचे समजते.

You may also like

Popular News