गुप्तधनासाठी बुरुज खोदणारे दोन आरोपी ताब्यात.. एक फरार..!

पूजेच्या साहित्यासह सोन्याचे तुकडे जप्त
हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील घटना

गुप्तधन काढण्यासाठी मध्यरात्रीच्या पुरातन कालीन बुरुजावर खोदकाम करणाऱ्या दोन जाणं पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलीस आल्याचे समजताच एकजण फरार होण्यास यशस्वी झाला आहे. सदरची घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुकात येणाऱ्या मौजे मंगरूळ येथे घडली असून, या खोदकामामध्ये तीन सोन्याचे हंडे काढण्यात आल्याच्या चर्चेने तालुका ढवळून निघाला असून, पोलिसांनी आरोपींकडून पूजेचे साहित्य व बनावट सोन्याचे तुकडे जप्त केले आहेत.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना हिमायतनगर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या धन काढणाऱ्या टोळीने शनिवारच्या मुहूर्तावर धन काढण्यासाठी गावातील काहींनी मिलीभगत करून नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एका मांत्रिकास बोलावले होते. त्या मांत्रिकाने बुरुजवर दाखविलेल्या जागेवर मध्यरात्रीला ४ वाजेच्या सुमारास खोदकाम करून धन काढण्यासाठी हणमंत गणपती लिंगणवाड रा.गागलेगाव ता.बिलोली, सुदर्शन तुकाराम बंदेवाड रा.मंगरूळ ता.हिमायतनगर आणि पवार रा.नायगाव या तिघांनी कमरेवढा खड्डा खोदला. दरम्यान तीन सोन्याचे हंडे सापडल्यामुळे आपसात वादावादी झाली. याची चर्चा गावभर पसरल्याने एका महिलेने पोलिसांना कळविले. घटना स्थळाकडे पोलीस आल्याचे समाजातच खोदकाम करणाऱ्यापैकी पवार रा.नायगाव याने तेथून धूम ठोकली तर पोलिसांनी आरोपी हणमंत गणपती लिंगणवाड आणि सुदर्शन तुकाराम बंदेवाड या दोघांस ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींची गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने मंगरूळ येथील देशमुखांच्या जुन्या पडीक वाड्यात संगनमताने खोदकाम करण्यापूर्वी लिंबू, नारळ, हळद, गुलाल, कोंबड्याचे पंख पिसे ठेऊन पूजा करून खोडं करून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस निरीक्षक ज्ञानोबा काळे यांचवुया फिर्यादीवरून अघोरी प्रथा व जादूटोणा कलम कायद्यानुसार अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१९ चे कलम ३४ आयपीएस प्रमाणे वरील तीन आरोपीतांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस डायरीत गुन्हा नोंद झाला असला तरी सोन्याचे हंडे काढले कि नाही याबाबत अधिकृत नोंद झाली नसली तरी संपूर्ण हिमायतनगर तालुका मात्र सोन्याचे तीन हंडे सापडल्या प्रकरणाच्या चर्चेने ढवळून निघाला आहे. सादर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वतः करीत आहेत.

या संदर्भात पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सोने काढण्याचे सोंग केलेल्या पैकी दोघांना अटक केली असून. त्यांच्याकडून पूजेचे साहित्य आणि सोन्याचे काही तुकडे जप्त केले आहेत. ते जप्त सोने खरे आहे कि, नाही याची तपासणी सोनाराकडून केली असता बनावट सोने म्हणजे पितळेचे असल्याचे समोर आले आहे. तीन हांडे सापडल्याची चर्चा हि केवळ अफवा आहे. यामध्ये फरार झालेल्या आरोपीस लवकरच अटक करणार असून, अटक दोन्ही आरोपीना न्यायालयात हजार केले असता प्रथम २ दिवस पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना भुलून अंधश्रध्येला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.

You may also like

Popular News