पैनगंगा नदी कोरडी पडल्याने चारा – पाणी टंचाईची भीषणता वाढली

इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे
शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी तीन महिन्यापासून कोरडी ठाक पडल्याने नदी काठावरील गावासह जनावरांच्या चारा आणि पाण्याची भीषणता वाढली आहे. हि बाब लक्षात घेत इसापूर धरणातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम यांच्यासह नदीकाठावरील शेतकऱ्यांनि केली आहे.

पैनगंगा नदीकाठावर अवलंबून असलेल्या ४५ गावकर्यांना नोव्हेंबर महिन्या पासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून, नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. खरे पाहता पाणी त्यांची लक्षात घेता येथील पंचायत समिती स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन पाण्याची मागणी करणे क्रमप्राप्त आहे. परंतु नदीकाठावरील त्या त्या गावचे सरपंच व ग्रामसेवक या बाबतीत दुर्लक्ष करत असल्याने पाणी टंचाईच्या झाला ग्रामस्थांना सहन कराव्या लागत आहेत. मागील अनेक वर्षापासून नदीकाठावरील गावकर्यांना फेब्रुवारी – मार्च महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यंदा खरीप हंगामात वरून राजाने केलेली अवकृपा आणि पावसाचे पाणी पुढे वाहून गेल्याने दिवाळी पासूनच नदी काठावरील गावकर्यांना भीषण पाणी टंचाई बरोबर जनावरांच्या चार्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या प्रकारामुळे नागरिक हतबल झाले असून, पाणी नाही चार नाही, म्हणून आपली जनावरे आठवडी बाजारात विक्रीला आणत आहेत. दरवर्षी पाण्याची मागणी प्रथमतः विदर्भवासीयांकडून होत असते, त्यामुळे मराठवाड्यातील प्रशासनाने देखील पाणी टंचाईच्या बाबतीत पुढाकार घेऊन यावर मात करणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरीकातून व्यक्त होत आहे.

आजघडीला पाणीटंचाईने हैराण झालेले शेतकरी जनावरांना विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. परंतु येथे देखील जनावराना भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून, शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी आणि नुकसानीची मदत शेतकऱ्यापर्यंत पूर्णतः पोचली नसल्याने आजही अनेक शेतकरी भरतीत स्टेट बैंकेत कर्जमाफी व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बैंकेत अनुदानाचा निधी मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनस्थितीत सापडला आहे. खरीपात म्हणावा तसा पावूस झाला नसल्याने रब्बीची पिके घेण्यासाठी जमिनीची कुवत नसल्याने रब्बीचे क्षेत्र घटले आहे. या परिस्थितीकडे पाहून शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत जाहीर करावी आणि शेतकर्यांना आर्थिक अडचणीतून सोडवावे अशी मागणी झाली होती पर्णातू याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, दरम्यान लोकसभा निवडणूक लागल्याने सरसकट कर्जमाफीचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.

या चिंतेत बळीराजा असताना पैनगंगा नदी कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठावरील शेतकरी, नागरिकांना पाणी टंचाई भेडसावत आहे. तर जनावरांना जमा असलेल्या खड्ड्यातील पाणी पिवून आजारांना बळी पडावे लागत आहे. या परिस्थितीची जाणीव लक्षात घेता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, इसापूर धरणातील पाणीसाठा पैनगंगा नदीत सोडून पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या मानवांसह मुक्या जनावरांना दिलासा द्यावा अशी मागणी नदीकाठावरील नागरिक शेतकरी करीत आहे.

हिमायतनगर शरातील ५० टक्के बोअर आटले
पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील बहुतांश बोअरची पाणी पातळी घातली असून, त्यापैकी ५० टक्के बोअर आटले आहेत. परिणामी शहरातील नागरिकांनी पाणी टंचाईच्या झळा लागल्या असून, ठण भागविण्यासाठी १७० रुपयाला ५०० लिटर पाण्य्ची टाकी घेऊन दिनचर्या चालवावी लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शहरासाठी १९ कोटीची पाणी पु रवठा योजना मंजूर झाली परंत्तू ती सुद्धा अधांतरी लटकल्याने शहरातील नागरिकांची भिस्त पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नदीपात्रात बाबी सोडणे गरजेचे आहे.

You may also like

Popular News