जिप. बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याकडून रस्त्याची थातुर मातुर पाहणी

गुत्तेदाराच्या गाडीत आले आणि परतले
कामाचा दर्जा सुधारला नाहीतर गावकरी उपोषणाच्या तयारीत

हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने दोन दिवसापूर्वी गावातील युवकांनी काम बंद पाडले. तात्काळ कामाचा दर्जा सुधारला नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर दि.२९ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता श्री कांबळे यांनी दुपारी भेट देऊन सदर कामाची थातुर – मातुर पाहणी केली. तसेच नागरिकांनी सोशियल मीडियावर टाकलेल्या किल्प आणि फोटोबाबत नाराजी व्यक्त करून अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे अभियंत्याच्या कारभाराबाबत गावकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नांदेड – किनवट राज्य रस्ता ते खडकी बा.कडे जाणाऱ्या ८०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरनाचे काम सुरु असून, यासाठी सार्वजनीक बांधकाम विभाग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत २० लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे ठेकेदारी नांदेड येथील वटमे नामक गुत्तेदार करीत आहेत. सदर काम करताना ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाच्या बगल देऊन थातुर – मातुर काम केले जात असल्यामुळे खडकी बा. येथील युवा कार्यकर्ते, गावकर्यांनी व वाहनधारकांनी काम बंद पाडून ठेकेदाराच्या निकृष्ठ कारभाराबाबत रोष व्यक्त केला आहे. एव्हडेच नव्हे तर या संबंधीचे व्हिडीओ व छायाचित्र सोशियल मीडियावर टाकून रस्त्याचे काम थेट मातीतच अल्प प्रमाणात डांबर व गिट्टी टाकून ठेकेदाराकडून केल्या जाणाऱ्या बोगस कामचे पितळे उघडे पाडले. सदरचे काम रातोरात उरकून मार्च एन्डपूर्वी देयके उचलण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच्या रस्त्याच्या कामात सुधारना न झाल्यास सबंधित अधिकरी व गुत्तेदार यांच्या वीरोधात जी.प.नांदेड येथे तक्रार देऊन येत्या दोन दिवसात आमरण उपोषन करन्याचा निर्णय खडक बा.येथिल सर्व गावकरी व युवक वर्गाने घेतला आहे.

एकूणच या रस्त्याबाबतचे वृत्त प्राकाशित होताच सदर बांधकामावर देखरेख करणारे कनिष्ठ अभियंता श्री कांबळे यांनी गुत्तेदारासह रस्त्याच्या कामाची शुक्रवारी दुपारी थातुर – मातुर पाहणी केली. तसेच येथे उपस्थित नागरिक पत्रकारांसमोर रस्त्याचे काम करणाऱ्या लेबरला काम चांगले करा अश्या सूचना देऊन, पुन्हा गुत्तेदाराच्या वाहनातून शहर गाठले आहे. तसेच सादर रस्त्याच्या कामाचे व्हिडीओ क्लिप करवून लोक हे करत आहेत असे म्हणत तक्रार कर्त्याबाबत एक प्रकारे नाराजी व्यक्त करून काम चांगलंच होतेय असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गावकरी वर्गातून कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अभियंत्याच्या कारभाराची चौकशी व्हावी अभियंता हा गुत्तेदाराचा कि शासनाचे काम चांगले करून घेणारा जनतेचा…? असा प्रश्नही या निमित्त उपस्थित झाला आहे.

एकूणच खडकीच्या रस्त्याची होत असलेल्या निकृष्ट कामाची उच्च स्तरीय अभियंत्या मार्फत गुणनियंत्रण मापक मशीनद्वारे करून त्याला अभय देणाऱ्या अभियंत्यावर दंडात्मक कार्यवाही करावी आणि गुत्तेदाराने बोगस काम करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याबद्दल दंडात्मक कार्यवाही करून एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आत जोर धरू लागली आहे.

You may also like

Popular News