सर्व ज्येष्ठ नागरिकांनी 100 टक्के मतदान करा व इतरानाही प्रवृत्त करा – डॉ.हंसराज वैद्य

1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा भारताची लोकसंख्या तिस कोटी होी. त्यात ज्येष्ठांची संख्या केवळ 76 लाख एवढी होती. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. 1952 पासून दर पाच वर्षानी निवडणुका घेतल्या जातात व ज्या पक्षाचे खासदार जास्त त्या पक्षाला सरकार बनविण्यास पाचारण केले जाते.

आता भारताची लोकसंख्या 130 कोटीहूनही जास्त आहे. त्यात ज्येष्ठांची संख्या 14 कोटीहून ही अधिक आहे. ज्येष्ठ महिला मतदाराची लक्षणीय संख्या आहे व ज्येष्ठ मतदारापेक्षा जास्त आहे. ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व वाढत राहणार आहे. याचे कारण म्हणजे उन्नत जीवनशैली व आरोग्य क्रांती होय. महाराष्ट्रापुरतेच पहावयाचे झाल्यास राज्यात ज्येष्ठांची संख्या ही जवळ जवळ दिड कोटीच्या घरात आहे. निव्वळ एकट्या पुणे शहरात 6 लाख ज्येष्ठ नागरिक पहावयास आहेत व नांदेड जल्ह्यात 35 हजार ज्येष्ठ नागरिक आहेत. प्रत्येक कुटूंबात किमान एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी 16 पंचवार्षीक निवडणुकीत भाग घेतलेला आहे आणि आता सतराव्या लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. एक ज्येष्ठ नागरिक घरातील किमान सहा मताचा राजा (तो स्वतः, पत्नी, मुलगा, सून, मुलगी व जावई) आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. हा मतदार पोक्त वैचारिक बैठक असलेला अनुभवी, प्रामाणिक, दिलेला शब्द पाळणारा मतदार आहे.

ज्येष्ठ नागरिकाचे आयुर्मान वाढत आहे. संख्याही वाढत आहे. त्या प्रमाणात त्यांच्या गरजा व समस्या ही वाढत आहते. ज्येष्ठ नागरिकांनी स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षही भाग घेतलेला आहे. कुटूंब, समाज तथा राष्ट्र उभारणीतही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. राष्ट्र उभारणीत ज्येष्ठांचे मोठे योगदान आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकापासून ते सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी सात दशकं भाग घेतलेला आहे. तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यच (फेस्कॉम) नव्हे तर देश पातळीवर (अ‍ॅस्कॉन) आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ज्येष्ठांच्या संघटना कार्यरत आहेत.जागतीक व देश तथा राज्य पातळीवर ज्येष्ठांची वयोमर्यादा साठ वर्षे ग्राह्य धरलेली आहे. ज्येष्ठांचे धोरणही अंमलात आणले जाते व सर्व सुख सोई दिल्या जातात. भारतातील महाराष्ट्र राज्याच्या शेजारील आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा, दिल्ली, झारखंड आदि राज्यात गरीब, गरजू, दुर्लक्षीत तथा वंचीत शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, कामगार ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा 2000 ते 2500 रूपये मानधन दिले जाते. त्या धरतीवरच महाराष्ट्र राज्यातही शासनाने ज्येष्ठांची वयोमर्यादा 60 वर्षच ग्राह्य धरावी व सर्वात उशीरा का होईना मान्य केलेले धोरण अंमलात आणावे. प्रतिमहा 3000 रूपये सवोनिवृत्ती वेतन तथा मानधन मिळावे या मागणीसाठी विभागीय फेस्कॉम व इतर ज्येष्ठ नागरिक संलग्नित संघटनांनी सतत पाठपुरावा केला. या संघटना नांदेडमधील सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ आणि नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने हजारो ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड लक्षवेधी धरणे व सत्याग्रह करण्यात आले. शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला पण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासनानेही ज्येष्ठांच्या प्रलंबीत मागण्या व चळवळीकडे कमालीचे दुर्लक्ष केले. ज्येष्ठांच्या एकजुटीमुळे एक गठ्ठा मतदान व इतर मतदारानाही ते प्रभावीत करून मतदान वळवू शकतात. सार्वत्रिक निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला संघटनेच्या माध्यमातून निवडून आणू शकतात व निवडून येणार्‍या उमेदवारास पाडूही शकतात. आज एवढी ताकत ज्येष्ठ नागरिक संघटनात एकवटलेली आहे. आजूनतरी कोणत्याही पक्षाने किंवा उमदेवाराने आपल्या निवडणुक जाहिरनाम्यात किंवा वचननाम्यात ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याला स्थान दिलेले नाही. किंवा स्थान देणे गरजेचे मानलेले दिसत नाही. आजही ज्येष्ठ नागरिक संघटना व ज्येष्ठ नागरिक जो कोणता पक्ष किंवा उमेदवार ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नास महत्व देईल किंवा प्राधान्य देवून त्यांचा विश्वास संपादन करेल, त्यांना आपलेसे करून घेईल, त्या पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या पारड्यात त्यांचे एक गठ्ठा मतदान मिळू शकेल. पण तेवऐ वेळेचे भान किंवा समयसुचकता कुण्याही नेत्यात, पक्षात किंवा उमदेवारात दिसून येत नाही.

ज्येष्ठ नागरिकांच्या नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्यावतीने व सहयोग ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांना असे जाहीर आवाहन करण्यात येते की, सशक्त लोकशाहीसाठी येत्या 17 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी कुठल्याही, कसल्याही, सबबी पुढे न करता कुठल्याही आमिषाला बळी न पडता, निर्भीडपणे जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून 100 टक्के मतदान करावे व इतरानाही मतदानास प्रवृत्त करावे, राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अमुल्य अधिकार वापरून आपले घटनात्मक कर्तव्य म्हणून पार पाडावे, असे आवाहन डॉ.हंसराज वैद्य यांनी केले आहे.

You may also like

Popular News