बासरची गोदावरी नदी कोरडीठाक…

भक्तांना करावा लागतो टंचाईचा सामना

तेलंगणा राज्यातील बासर येथील माता सरस्वतीचे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले असून, यंदा हि गोदावरी नदी कोरडीठाक पडल्याने सुट्ट्याच्या दिवसात दर्शन व पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भक्ताना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

तेलंगणा – महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्येची आराध्य दैवता समजल्या जाणाऱ्या माता सरस्वतीचे प्राचीन मंदिर असून, हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर उंच टेकडीवर वसलेले आहे. या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश, कर्नाटकासह दूर दूरवरून हजारो भक्त दर्शनासाठी येतात. आपल्या चिमुकल्यास ज्ञान मिळावे आणि विद्येचा देवीचे आशीर्वाद कुटुंबावरती सतत राहावे हा मनोकामना धरून भक्त येथील सरस्वती मातेचे दर्शन घेऊन कामना करतात. शैक्षणिक काळामध्येय ज्यांना येथे येता आले नाही असे भाविक – भक्त सुट्ट्याच्या दिवसात या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत. परंत्तू यंदा बासराच्या मंदिराच्या पायथ्यापासून वाहणारी गोदावरी नदी मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच संपूर्ण कोरडीठाक पडल्याने येथे येणाऱ्या भक्ताना गंगास्नानाचे पुण्यप्राप्त करणे दुरापास्त झाले आहे. नदी कोरडी पडल्याने भक्ताना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर उपपयोजना करण्यासाठी मंदिर समितीने भक्तनिवासाच्या माध्यमातून सोय केली असली तर सर्वसामान्य भक्तानी केलेली कामना व इच्छा पूर्तीसाठी गोदावरी नदीमध्ये पाणी आल्यानंतरच पुन्हा दर्शनासाठी बासरला यावे लागणार आहे.

…..अनिल मादसवार, नांदेड.

You may also like

Popular News