बिबट्याच्या धुमाकुळाने डोल्हारीच्या खालील भागात पैनगंगेला आले पाणी

काही गावांचा तात्पुरता पाणीप्रश्न सुटला…
तर नदीकाठावरील बहुतांश गाव टंचाईच्या सावटामध्ये

विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या चार महिन्यापासुन कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठच्या गावांत पाण्याचा ठणठणाठ झाला होता. यामुळे जनावरासह वन्य प्राण्याना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तसेच नदीपालीकडे असलेल्या अभयारण्यातील वन्य प्राणी बिबट्यासह इतर प्राण्यांनी वारंगटाकळी भागात शिरकाव करून धुमाकूळ घालून तिन जनावरे फस्त केली. पाण्याच्या शोधात बिबट्या वावरत असल्याचे वृत्त प्रसारित झाल्याने आणि टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने पैनगंगेला कालव्याद्वारे पाणी सोडले असुन, डोल्हारी पासुन वारंगटाकळी पर्यंत पाणी आल्यामुळे तात्पुरता या भागातील पाणी प्रश्न सुटला असला तरी पळसपूर पासून वरील गावच्या गावकऱ्यांसह तालुक्यातील बहुअंशी गावात टंचाई कायम आहे.

यवतमाळ – नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी काठी कोरडीठाक पडल्याने विदर्भातील पिपंळगाव मराठवाड्यातील वारंगटाकळी गावालगत असलेल्या अभयारण्यातून गेल्या दोन महिन्यापासुन बिबट्या सह इतर वन्य प्राणी वावरत आहेत. ह्या बिबट्याने पिपंळगाव, मंगरूळ , वारंगटाकळी, धानोरा शिवारात धुडगुस घालून शेतातील आखाड्यावरील जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या. ह्या नदी पाञात पशुसह जनावरांना तहाण भागविण्या पुरतेहि पाणी नसल्याने या भागातील आखाड्यावर पाण्याच्या शोधात बिबट्या येत होता. बिबट्याच्या भितीने शेतकर्यांनी शेतात आखाड्यावर बाधंण्यात येणारी जनावरे गावाकडे घेऊन जाऊन जागलीवर जाणे बंद केले होते.

तर पैनगंगेला पाणी विदर्भातील गांजेगाव, सावळेश्वर ,बिटरगाव, तांडा, पिपंळगाव, ढाणकी, देवरंगा, पेंदा ,मुरली या गावासह मराठवाड्यातील शिरपली ,कौठा, कौठा तांडा, बोरगडी तांडा, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ या गावांतील मानवासह पशु प्राण्यांना टंचाईच्या झाला सोसाव्या लागत होत्या. हि बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी प्रशासनाकडे ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन केली होती. उन्हाच्या तीव्रतेने ४५ अंशसेल्सियस पार केल्यामुळे दाहकता वाढून पाण्याचे स्रोत पूर्णतः आटले. परिणी मुक्या जनावरांसह मनुष्याने काम सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तर पशु – पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होऊन जिव टागंनिला गेला होता. हे हाल पाहूनदोन महिन्यापासुन पाञ कोरडे पडल्यामुळे नदी काठच्या गावांतील पाणी पुरवठ्याच्या नळ योजनाही बंद पडल्या होत्या. नदीकाठावरील पळसपूर गावाने तर भिषण पाणी टंचाइमुळे लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे लेखी निवेदन दिले. यासह अनेक गावात पाणी टंचाइ निर्माण झाली आहे. आजही पळसपुर ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आजघडीला पैनगंगा नदीला पाणी सोडल्यामुळे शिरपली पासुन वारंगटाकळी पर्यंतच्या गावांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी याच नदिकाठावरील काही गावांना पाणी नसल्यामुळे पाण्याचे संकट उभे आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ पैनगंगा नदीमध्ये पाणी सोडून पाण्यापासून वंचित वरील गावाला पाणी सोडून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

You may also like

Popular News