मुखेड येथील शिक्षकाचा धबधब्यात पडून मृत्यू

मुखेड येथील अशोकनगर भागातील सचिन शेषराव वाघमारे वय 31 वर्षे यांनी मित्रांसोबत पाडाघर धबधब्यावर मित्राच्या विनंती वरुन पोहण्यासाठी आत पाण्यामध्ये गेले असता त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने व त्याला पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास घडली असून या घटनेबद्दल मुखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, मयत शिक्षक सचिन शेषराव वाघमारे वय 31 वर्षे रा. मुखेड येथील अशोकनगर येथील रहिवासी यांनी देवगड तालुक्यात प्राथमिक शिक्षक होते. बुधवारी त्यांनी आपल्या रोजच्या पाच-सहा मित्रांसोबत पाडाघर येथील धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. त्यांना बिलकुल पोहता येत नव्हते. पण त्यांना मित्राने कमी पाण्यामध्ये पोहण्याचा सल्ला दिल्याने ते एका कडेला कमरेइतक्या पाण्यात पोहण्यासाठी आत गेले. नंतर मध्ये पोहत-पोहता बाजूला खोल पाण्यात गेले असता त्यांनी पाण्यात बुचकळ्यात खात होते हे मित्राने बघताच त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी प्रयत्न मात्र निष्फळ ठरले शेवटी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मित्राने देवगड पोलीस स्थानकात दिली. यावरून पोलिसाने पोलीस पंचनामा करून आकस्मित मृत्यूचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पवार हे करीत असुन त्यांच्यासोबत पोलीस कॉ. पराग मोहिते, काकडे हे होते. सचिन वाघमारे यांच्या पश्चात एक सहा वर्षाची मुलगी, पत्नी व माता – पिता असा परिवार असून या कुटुंबावर कधीही भरून न निघणारा दुःखाचा डोंगर पसरला आहे.

You may also like

Popular News