छोटा भीम कुंफु धमाकामध्ये बादशाह आॅफ पंजाबी पॉप

दलेर मेहंदीच्या आवाजात एंथम साँग

भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ऍनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. “छोटा भीम कुंग फु धमाका” असे त्या चित्रपटाचे नाव असून तो ३ डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून, फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी यांनी गाणं गायलं आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील अशी खात्री आहे.

या चित्रपटातील गाण्याबद्दल बोलताना दलेर मेहंदी म्हणतात, या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं छोटा भीमवर आधारित आहे. जो कायम खलनायकांपासून आपल्या मित्रांचं रक्षण करत असतो. तर या गाण्याचे संगीतकार सुनील कौशिक आहेत. ऊर्जा आणि पंपिंग पॅक असलेलं हे गाणं छोटा भीमच्या प्रतिमेचं वैशिष्ट्य ठरत आहे. हे प्रमोशनल गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण यातून छोटा भीम आणि त्याच्या मित्रांच्या मैत्रीतली ताकत आपल्याला दिसून येते.

छोटा भीम हे आजच्या लहान पिढीचे आकर्षण आहे. मला या चित्रपटासाठी गाणं गायला मिळालं यातच मला खूप आनंद आहे. माझी ५ वर्षीय मुलगी रुबाब हि सुद्धा छोटा भीमची खूप मोठी चाहती आहे. ती सुद्धा या गाण्यामध्ये असल्यामुळे तिने या गाण्यासाठी केलेली तयारी यातून तिची एक वेगळी भूमिका दिसत आहे आणि ती या गाण्यावर चित्रित विडिओ मध्ये सुद्धा दिसणार आहे. वास्तविक रित्या एका फिचर फिल्ममधे अशाप्रकारे गाण्यावर चित्रित विडिओ हा आमचा पहिलाच प्रयोग आहे आणि हा प्रयोग यशस्वीरीत्या सुपरहिट करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या गाण्यातील एनर्जी लहान मुलांसहित मोठ्यांनाही थिरकायला लावणारी आहे. मला खात्री आहे कि सगळेच याचा आनंद नक्कीच घेतील. या चित्रपटाचे निर्देशक राजीव चिलाका म्हणतात, या चित्रपटामध्ये दलेर मेहंदी यांनी गायलेलं गाणं यासाठी आम्ही खूपच उत्सुक आहोत. या गाण्याची रेकॉर्डिंग संपली असून याचा म्युझिक विडिओ सुद्धा करण्याची योजना आम्ही करत आहोत. या गाण्यासाठी दलेर जीनी जबरदस्त काम केलं आहे आणि मला विश्वास आहे कि हे गाणं मुलांना खूपच आवडेल आणि ते याचा अनंद लुटतील.

“छोटा भीम कुंफू धमाका” या चित्रपटात भीम आणि त्याचे मित्र चीन मध्ये जगातील सर्वात मोठ्या कुंफू स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जातात. मात्र भीमला चीनच्या राजकुमारीला दृष्ट जुहूनपासून वाचवण्यासाठी बोलावलं गेल्यामुळे कशाप्रकारे त्या स्पर्धेत अडथळे निर्माण होतात याची कथा या चित्रपटात आहे. राजीव चिलका आणि बिनायक दास निर्देशित, ग्रीन गोल्ड ऍनिमेशन द्वारा निर्मित आणि यश राज द्वारा वितरित “छोटा भीम कुंफू धमाका” हा चित्रपट १० मे २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे.

You may also like

Popular News