साद देती हिमशिखरे

कांचनजुंगा सिक्कीम ट्रेक जगातील तिसऱ्—या क्रमांकाचे उंच हिमालयीन शिखर आणि जगातील अंत्यत अवघड दहा ट्रेक पैकी एक. या कांचनजुंगाच्या दुर्दम्य हिमशिखरावर नांदेडच्या नावाचा ध्वज फडकवला ती तारीख होती दि. 17 नोव्हेंबर 2018 ची चांदणी रात्र. जेव्हा पूर्ण नांदेड शहर निद्रादेवीच्या आराधनेत मग्न, मस्त गुलाबी थंडीत रजई पांघरूण गुडुप झालेले तेव्हा महाराष्ट्राचे मावळे जय महाराष्ट्र करत हिमशिखराचे दर्शन घेत होते.

झळाळता सोनेरी राजमूकूट घालून कांचनजुंगाचे हिमशिखर सुर्यदेवाच्या पहिल्या किरणांचे स्वागत करतो तो क्षणच अद्भूत आहे. शब्दातीत आहे. त्याचा अनुभव याची देही याची नयनी घेणे म्हणजे स्वर्गाला गवसणी घालण्यासारखे आहेच. मनात भयाचे कारंजे इकडे थुईथुई नाचत असताना गोयचाला पास वर तापमान उणे 18 च्या हिमालयीन राकट शीत वाऱ्—याला तोंड देत पूढे निमुळत्या कडया-कपारी पार करत हिमशिखरे पादाक्रांत करणे ही कल्पनातीत गोष्ट होती. पण ही अनुभुती घेतली सहयाद्रीच्या 39 मावळयांनी. खरोखरच महाभाग्याने त्यांनी ध्वज फडकवला. कारण त्यांनी स्व:त अनेक ट्रेकर्संना काहीना काही कारणामुळे निराश होऊन माघारी फिरताना पाहिले होते. परंतू अदम्य साहस आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्याची धडाडी वृत्तीमुळेच कांचनजुंगाचे शिखर हयांच्या नजरी पडले होते. नांदेडचे नाव रोवले डॉ.लक्ष्मीकांत बजाज व डॉ.शिवराज टेंगसे यांनी जय महाराष्ट्रच्या घोषात अंत्यत राकट हिमशिखराला गवसणी घालणे ही लक्षणीय कामगीरीच होती. देहभान हरपले होते. कॅॅमेरेही स्तब्ध झाले होते. क्षणभर डोळेही पाणावले पण लगेचच सावरत हे दृष्य मनात साठवत होेते. मन मात्र भुतकाळात या भाग्याचा ठेवा कसा मिळवला हे शोधत होते.

आठवत होते डॉ.चंद्रशेखर भालेराव यांचा परभणीहून सकाळी ट्रेकींगसाठी टिकीट्‌स बुक करण्यासाठी फोन आलेला. सहज साध्या गप्पांच्या ओघात कांचनजुंगाला आपल्याला जायचे आहे म्हणुन मी तुझे रजिस्ट्रेशन केले आहे हे मला न विचारताच हक्काने केलेले मित्राचे सांगणे. मी तर अवाकच झालो होतो.चंदुच्या मायाजालात सगळेच ओढले जातात. खरेतर चंदुने समुद्रमंथनाच्या वेळी अवतरायला हवे होते म्हणजे त्यांच्या गप्पांच्या मायाजालात सर्वच राक्षसगण अडकले असते व भगवान विष्णुला मोहीनी अवताराचीही गरजभासली नसती. आतारजिस्ट्रेशन झाल्यामुळे मी कांचनजुंगा ट्रेकींगबाबत जेव्हा माहीती काढली तर उणे 15 तापमानात आपण चढु शकतो काय ? अशी मनात भीती होती. ट्रेकला न जाण्यासाठी सुरूवातीला थोडया पळवाटाही काढल्या. पण इकडे चंदु तर तिकडे अर्चना म्हणजे सहचारिणी. तीचे आग्रही सांगणे जेव्हा अरूणिमा सिन्हा (पायात कुबडया घेऊन) माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करू शकते. तेव्हा तुम्ही का नाही ? शेवटी मनाचा निर्धार केला व इकडे परभणीमध्ये मात्र 21 डॉक्टर्स मंडळी व 18 व्यापारी — शिक्षकांचा चमु होता. त्यांचे रोजचे 6—7 किलोमिटर पळणे व एक ते दोन तास वेगवेगळे व्यायाम यांचे व्हाट्‌स ऍपवर वेगवेगळे फोटोज येत होते. परंतु नांदेडमध्ये मात्र आम्ही दोघेच मी व डॉ.टेंगसे. त्यामुळे मनातुन हया सर्व जाचातुन सुटल्यासारखे वाटते होते.

सर्कशीसतल्या शोसाठी सर्व प्राणयांना जसे ऐकमेकानंतर कावयती करून घेतात तशी काही त्यांची अवस्था. मी मात्र इकडे सुखाने झोपेल असे वाटत असताना नांदेड क्लब जिमच्या माझ्या ट्रेनर संदीप ला कळाले की मी कांचनजुंगाला जाणार आहे मग काय त्याने फंक्शनलकार्डीयो, हाय इंटेन्सीटी वेट ट्रेनिंग असे अनेक प्रकार घेण्यास सुरूवात केली की शेवटी परभणी चमू शरणम्‌ गच्छामी च बरे असे वाटू लागले. घरातुन सर्वच उत्साही. बळीला जाताना जसे बोकडाला हारतुरे घालतात तसे संजय, अनुपने खास दोन जॅकेट मागवुन दिले. शेवटी एकदाची ट्रेकच्या सामानाची जमवाजमव झाली. 11 नोव्हेंबरला युक्सूमचा पोहचलो. कुमार हा संयोजक होतात्याचा ताफा 19 व्यक्ती, 6 याक, 7 घोडे, असा 60 लोकांचा ताफा यूक्सूम येथून रवाना झाला. यूक्सूमच्या इतिहासातली ती पहीलीच घटना 40 डॉक्टरर्स का ग्रुप म्हणून फूल चर्चा पहिला मुक्काम 9 किमी. साचेन येथे पहिलाच दिवस टेंटमध्ये रहायचातेही घनदाट जंगलात 5 वाजताच गडद अंधार.
आता सर्वांनी झोपण्याची तयारी सुरू केली. सर्वांनी गरम कपडे स्वेटर पारीधान करून सगळेच जण एस्किमोसरखे दिसायला लागलो हिमाचलचे संध्याकाळचे वारे अतिशय भयानक थंडी आणनारे असतात. सर्वांना जवळची सामुग्री तुटपुंजी वाटायला लागली. स्लिपिंग बॅग उघडल्या एकतर त्या पिशव्यामधुन झापता येईनात्या झोपेच्या पिशव्यामधुन झोपण्याचे एक शास्त्र आहे. गादी फाडुन आत घुसल्यासारखे त्या पिशवीत घुसुन गळयापर्यंत नाडया बांधुन घ्यायच्या आणि डोक्यावर टोपडे ओढुन कान डोळे नाकपुडया उघडया ठेवायच्या पायात मोजे आत पायजमा गरम विजार पून्हा गरम शर्ट.

एवढा साजशृंगार करून आम्ही त्या स्लिपींग बॅगमधे घुसायचा प्रयत्न करता करता जेरीला आलो आधीच हवा प्रचंड थंड पून्हा तंबुत लाईट नाही बरे बिछानाही तोच पांघरूणही तेच बॅगमध्ये शिरल्यावर पून्हा हातपाय पसरायची सुद्धा सोय नसते. बाहेर थंडीचा पारा झरझरखाली जात होता थंडीचा ईतका बंदोबस्त करूनही पोटातुन भात शिजल्यासारखी थंडी शिजुन येत होती बरे बाहेर निघावे तर बाहेर पूर्ण अंधार. अशा घनदाट अरण्यात आकाशात चंद्र कसा दिसतो बघण्याची ईच्छा होती पण आमची अवस्था अवघडलेल्या बाळंतिणीसारखी झालेली. मध्यरात्री याकच्या गळयातल्या घण्टया वाजायच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो खरेतर शयनमंजुषेतून बाहेर पडणे ही एक सर्कसच होती. ती केली. ईतर मंडळी ढाराढूर झोपलेली आन्हिक उरकावे म्हणुन तंबुबाहेर डोके काढले सकाळचे पाच वाजले होते पण प्रकाश सर्वत्र फाकला होता. कॅप्टन स्वयंपाकी कुमारच्या स्वंयसेवकाची हालचाल सुरू झाली होती. अशा थंडीला न जुमानता ते सर्वासाठी चहा नास्ता हयाची तयारी करीत होते. जिथे स्वतःचे आन्हिक उरकणे हाच कष्टदायक प्रकार असतो तिथे फक्त ट्रेकर्सचे कौतुक हिम्मत वाढाण्यासाठी हे लोक स्वतःच्या ंगावाहुन इतक्या दूर येतात व पुन्हा महिनाभर राहतात ऋषीच्या तपस्येपेक्षाही महान तपस्या आहे. चहा नास्ता आला पूर्ण प्रवासात जे पुरी भाजी छोले भटोरे बटाटे भाजी देतात या खादयसामुग्रीची बेस कॅम्पवरूनवरपर्यंत पोहचती करणे ही खरोखरच कमाल आहे. कुमक आणने व नेणे हया भयाण उंचीच्या डोंगराळ भागात खुप कठीण आहे.

तिसऱ्या दिवशी आम्हाला सैनिकाप्रमाणे सर्व शस्त्र अस्त्र समवेत जिरटोप म्हणजे आमच्यासाठी कानटोपी शस्त्र म्हणजे लाकडी काठी पाठीवर रॅकसॅक त्यात पुढील पाच दिवससाठी लागणारे सर्व कपडे आवश्यक सामान तेही नऊ किलो पर्यंत पाठीवर लादले आणि ख-या युदधासाठी सज्ज झालो. आता आमचा संबध मुलकी जगाशी तुटला होता. साचेनशौकाझोण्ग्री ताण शिंगलाम्हूणीही मुक्कामाची ठिकाणं.. झोण्ग्री पासूनच बर्फ.. स्नो फॉलसुरूवात झाली. रोज साधारण 1000 मी उंच आणि 10 ते 15 किमी पायी प्रवास.जशी जशी उंची वाढत गेलीतशी थंडी वाढत गेली.21 डॉक्टर्स असल्यामूळे औषधी साठा व इतर सामग्री बरोबरच होती. तरी झोण्ग्रीला एक मुक्काम जास्तीचा करावा लागलाकारण त्या उंचीवरसगळयांना हाय अल्टीटयूड सिकनेस मुळे प्रत्येकाला डोकंदुखीमळमळीची सुरूवात झाली होतीसगळेच मनातून धास्तावले. त्यावेळेस डॉ. चंदू व डॉ. खटींग हयांनी गावराणी गप्पांनी मनोबल वाढवले. साधारण 600 मी उंचीवर झोण्ग्री टॉप येथुन कांचनजुंगा प्याण्डिमथ्री सिस्टर्सया पर्वतांच्या शिखराचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला जायचे होते.बर्फ पडलेलातापमान उणे 10. हातात दिलेल्या काठयांची मदत घेत भल्या पहाटे 3 वाजता हेड लाइटच्या उजेडात प्रवास सुरू झालाझोण्ग्री टॉप गाठलंअंधारात कळलंच नाही की आपण किती उंच आलोत.

सकाळी सहा वाजले असतील. अक्षरशः डोळयावर विश्वास बसत नव्हताशुभ्रधवल हिमशिखरे व त्यावरपडलेली सोनेरी किरणे .चहूबााजुंनी ढगांचा पहारा. निसर्गाचा अद्भुत नजारा. कल्पानातीत. झोण्ग्री ते थानसिंग 14 किमी अंत्यंत खडतर चढाई. हिमालयात साधा भूप्रदेश कुठेच नाही.ज्यामार्गातुन ट्रॅकिंगला जायचे असते तो मार्गही बिकट तरी असला तरी निसर्गसुदंर असतो.जसं जसं वरती जात होतोततशी झाडे खुरटी होत होती आणि त्याबरोबरच ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत होतं.थोडं चाललं की दम लागणेआणि थांबलं की थंडी वाजणेअशा विचित्र परिस्थितीत आम्ही अडकलो. चांगलं सुखा सुखी आयुष्य सोडून मी इकडे का आलोऋ ऋ असा एकही ट्रेकर नसेल ज्याच्या मनात हा विचार आला नसेल.परंतू हे खरंच आहेजसं जसं आपण हिम सागराकडे जातोतशी तशी ती शिखरं आपल्याला साद घालतातआव्हान करतातआणि आपली पावलं आपोआप पुढे पडत असतात. मग उंचीबर्फहवाऑक्सिजन याचा विचार न करता.थांगसिंग चा मुक्काम करून. सकाळी 7 वाजताशिवाजी महाराज की जय च्या घोषणा देतजथ्या पुढे निघाला. कांचनजूंगा दिसत होतंजोश सगळयांचा वाढला होता.

आमची लाम्हूणीच्या दिशेने चढाई चालु होती. तेवढयात सुमन आमचा एक गाईड धापा टाकत आला म्हणाला. सरजी वहां एक आदमी आखरी सांसे गिन रहा है ! आपमेसे जो डॉक्टर है उन्हे बुलाओ. मी..डॉ.टेंगसे नांदेड. आणि डॉ.केदार खटिंग परभणी. आम्ही तिघं लग बगीणेत्या टेंटकडेअक्षरशः पळतच गेलोपाहिलं तर साधारण चाळीशीतला तरूणटेंटमध्ये गंभीर अवस्थेत पडलेला होताश्वासोच्छास जवळ जवळ थांबेलेला. घेणंही त्याला अवघड जात होतंखरखर छातीतून आवाज येत होता. नाडी दाब पुर्णत ःकमी.एका टे्रकर ला हग्हि ाल्ततिुदए स्च्किन्एस्स्फटका होता हा. ठिकाणी आल्यावरफुफूसात पाणी जमा होऊन ऑक्सिजन च प्रमाण कमी होतं आणि श्वसन प्रक्रिया बिघडते.आता आमच्यातील टे्रकर एैवजी डॉक्टर जागृत झाला.रॅकसॅकमधील शरीरामधील ऑक्सिजन मोजायच यंत्र म्हणजेच पल्साक्स काढले.
ऑक्सिजनच प्रमाण फक्त 38त्इतक्या थंडीत आम्हालाच घाम फुटला. अतिदक्षता विभागात अनेक यंत्र व परिचारीका असतात पण ईथे घनदाट जंगलात कसे करावे. आमच्याकडे बुडेकॉर्टचा स्प्रे अन्‌ डॉयमॉक्स औषधी आणि आमचे गरम कपडे त्याच्या अंगावर टाकुन गरम करायचा प्रयत्न केला. अर्ध्यातासानंतर ऑक्सिजनच प्रमाण वाढु लागले. मृत्युच्या दाढेतुन वाचवल्याचे समाधान भेटले. त्याला खालच्या टेंटमध्ये घेवुन जाण्यासाठी सुचना केली पण स्ट्रेचरचा प्रश्न उद्भवला. पटकन लाकडाच एक स्ट्रेचर बनवूनचार जणं अक्षरशः त्याला घेवूनखालच्या दिशेने पळत सुटलेआम्हाला खात्री होतीखाली गेल्यावरर्23 तासात तो बरा होईल. ईकडे आमच्या बाकी मेंबर्सच्या मनात धाकधुक, व्याकुळता व प्रचंड भीती निर्माण झाली.पण काही वेळातच सगळयांचे मनोबल डॉ.केदार खटींग यांनी वाढविले. पुढचा शेवटचा मुक्कामलाम्हुणीलाआमच्या अगोदर किचन स्टाफने पोहचूनगरम गरम चहा व मॅग्गी ची सोय करून ठेवली होती.टेंट लावण्यात आले. कांचनजुंगा आणि पण्डिम या पर्वताच्या पायथ्याला अगदी स्वर्गातअसल्याप्रमाणे.साधारण 1300 मीटर उंच जायचं होतं. भल्या पहाटे 3 वाजता ला उठून. अंधारात फक्त हेड लाईटचा प्रकाश, काठी आणि सगळयांच्या मनातील औैत्सुकता गोयचला पास च्या दिशेने निघालो.

तापमान उणे 15जोराचा वारा.सर्वात कठीण रस्तात्यामुळे एकदम पाय घसरला की तोंडावर कुठे आपटु याचे काही गणितच नाही काही जागेवर निमुळता रस्ता बाजूला खोल दरी बाजुला पूर्ण बर्फ. कांचनजुंगाच्या शिखरावर पोहचलो. जिथून पूढे जायची सिक्कीम ग्ेव्.ची परवानगी नव्हती. बर्फाच्छाादित शिखरांवर सुवर्णकणांचा वर्षाच होत असेल अशी सोनेरीसूर्याची किरणं कांचनजुंगाला वंदन करणारी. सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सृष्टी स्वर्गच अवतरला आहे असे वाटते.गाईडच्या आदेशाला न जुमानता मी हातातला ग्लोव्हज काढले हा नजारा कैद करावा म्हणून. परंतू क्षणातच आपला हात मनगटापासून पुढे आहे की नाहीकळेनास झालेपटकन ग्लोव्हज चढवले. शोकाच्या मुक्कामी तो पेशंट भेटलाअक्षरशा पाया पडला. कलकत्याचा मोठा व्यापारी होता तो. या वर्षातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण..शोका लाघरच्यांशी सहा दिवसांनंतर संपर्क झालाबरेच जण भावूक झाले होते. बारा दिवसानंतर घरी पोहचलो.खरेतर आयुष्य म्हणजे पुनरूक्ती ब्रेकफास्ट अंाघोळ दुपारचे जेवण आलटुन पालटुन केलेल्या त्याच भाज्या, तीच कणीक, तीच डुलकी, तोच चहा हा झाला एक दिवस प्रतिक्षणी नवाजन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते पण त्याला ते शिकवाव लागत निसर्गात निर्झर झरा वन उपवने स्वतःसाठी फुलत असतात ट्रेकिंगमध्ये मनाची ताकद निसर्ग प्रतिक्षण वाढवत असतो एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या तो शिकतो पूर्ण आयुष्य आपण प्लॉट, पदवी नोकरीचे आरक्षण करत मुख्य आंनदाला पाारखे होतो. आयुष्यभर रूसवे फुगवे व अभिमान ला जोपासून ठेवतो. पणट्रेकिंगमध्ये कळते एक ग्लास, एक टिफीन, एक ब्लॅकेट व मिंत्राच्या प्रेमाची शक्ती असली तर आंनद लूटू शकता हे लक्षात येते क्षणनक्षण निसर्गाच्या सानिध्यात राहता येते.

कांचनजुंगा सिक्कीम ट्रेक जगातील तिसऱ्—या क्रमांकाचे उंच हिमालयीन शिखर आणि जगातील अंत्यत अवघड दहा ट्रेक पैकी एक. या कांचनजुंगाच्या दुर्दम्य हिमशिखरावर नांदेडच्या नावाचा ध्वज फडकवला ती तारीख होती दि. 17 नोव्हेंबर 2018 ची चांदणी रात्र. जेव्हा पूर्ण नांदेड शहर निद्रादेवीच्या आराधनेत मग्न, मस्त गुलाबी थंडीत रजई पांघरूण गुडुप झालेले तेव्हा महाराष्ट्राचे मावळे जय महाराष्ट्र करत हिमशिखराचे दर्शन घेत होते. झळाळता सोनेरी राजमूकूट घालून कांचनजुंगाचे हिमशिखर सुर्यदेवाच्या पहिल्या किरणांचे स्वागत करतो तो क्षणच अद्भूत आहे. शब्दातीत आहे. त्याचा अनुभव याची देही याची नयनी घेणे म्हणजे स्वर्गाला गवसणी घालण्यासारखे आहेच. मनात भयाचे कारंजे इकडे थुईथुई नाचत असताना गोयचाला पास वर तापमान उणे 18 च्या हिमालयीन राकट शीत वाऱ्—याला तोंड देत पूढे निमुळत्या कडया-कपारी पार करत हिमशिखरे पादाक्रांत करणे ही कल्पनातीत गोष्ट होती. पण ही अनुभुती घेतली सहयाद्रीच्या 39 मावळयांनी. खरोखरच महाभाग्याने त्यांनी ध्वज फडकवला. कारण त्यांनी स्व:त अनेक ट्रेकर्संना काहीना काही कारणामुळे निराश होऊन माघारी फिरताना पाहिले होते. परंतू अदम्य साहस आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्याची धडाडी वृत्तीमुळेच कांचनजुंगाचे शिखर हयांच्या नजरी पडले होते. नांदेडचे नाव रोवले डॉ.लक्ष्मीकांत बजाज व डॉ.शिवराज टेंगसे यांनी जय महाराष्ट्रच्या घोषात अंत्यत राकट हिमशिखराला गवसणी घालणे ही लक्षणीय कामगीरीच होती. देहभान हरपले होते. कॅॅमेरेही स्तब्ध झाले होते. क्षणभर डोळेही पाणावले पण लगेचच सावरत हे दृष्य मनात साठवत होेते. मन मात्र भुतकाळात या भाग्याचा ठेवा कसा मिळवला हे शोधत होते.

आठवत होते डॉ.चंद्रशेखर भालेराव यांचा परभणीहून सकाळी ट्रेकींगसाठी टिकीट्‌स बुक करण्यासाठी फोन आलेला. सहज साध्या गप्पांच्या ओघात कांचनजुंगाला आपल्याला जायचे आहे म्हणुन मी तुझे रजिस्ट्रेशन केले आहे हे मला न विचारताच हक्काने केलेले मित्राचे सांगणे. मी तर अवाकच झालो होतो.चंदुच्या मायाजालात सगळेच ओढले जातात. खरेतर चंदुने समुद्रमंथनाच्या वेळी अवतरायला हवे होते म्हणजे त्यांच्या गप्पांच्या मायाजालात सर्वच राक्षसगण अडकले असते व भगवान विष्णुला मोहीनी अवताराचीही गरजभासली नसती. आतारजिस्ट्रेशन झाल्यामुळे मी कांचनजुंगा ट्रेकींगबाबत जेव्हा माहीती काढली तर उणे 15 तापमानात आपण चढु शकतो काय ? अशी मनात भीती होती. ट्रेकला न जाण्यासाठी सुरूवातीला थोडया पळवाटाही काढल्या. पण इकडे चंदु तर तिकडे अर्चना म्हणजे सहचारिणी. तीचे आग्रही सांगणे जेव्हा अरूणिमा सिन्हा (पायात कुबडया घेऊन) माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करू शकते. तेव्हा तुम्ही का नाही ? शेवटी मनाचा निर्धार केला व इकडे परभणीमध्ये मात्र 21 डॉक्टर्स मंडळी व 18 व्यापारी — शिक्षकांचा चमु होता. त्यांचे रोजचे 6—7 किलोमिटर पळणे व एक ते दोन तास वेगवेगळे व्यायाम यांचे व्हाट्‌स ऍपवर वेगवेगळे फोटोज येत होते. परंतु नांदेडमध्ये मात्र आम्ही दोघेच मी व डॉ.टेंगसे. त्यामुळे मनातुन हया सर्व जाचातुन सुटल्यासारखे वाटते होते. सर्कशीसतल्या शो साठी सर्व प्राणयांना जसे ऐकमेकानंतर कावयती करून घेतात तशी काही त्यांची अवस्था. मी मात्र इकडे सुखाने झोपेल असे वाटत असताना नांदेड क्लब जिमच्या माझ्या ट्रेनर संदीप ला कळाले की मी कांचनजुंगाला जाणार आहे मग काय त्याने फंक्शनलकार्डीयो, हाय इंटेन्सीटी वेट ट्रेनिंग असे अनेक प्रकार घेण्यास सुरूवात केली की शेवटी परभणी चमू शरणम्‌ गच्छामी च बरे असे वाटू लागले. घरातुन सर्वच उत्साही. बळीला जाताना जसे बोकडाला हारतुरे घालतात तसे संजय, अनुपने खास दोन जॅकेट मागवुन दिले. शेवटी एकदाची ट्रेकच्या सामानाची जमवाजमव झाली.

11 नोव्हेंबरला युक्सूमचा पोहचलो. कुमार हा संयोजक होतात्याचा ताफा 19 व्यक्ती, 6 याक, 7 घोडे, असा 60 लोकांचा ताफा यूक्सूम येथून रवाना झाला. यूक्सूमच्या इतिहासातली ती पहीलीच घटना 40 डॉक्टरर्स का ग्रुप म्हणून फूल चर्चा पहिला मुक्काम 9 किमी. साचेन येथे पहिलाच दिवस टेंटमध्ये रहायचातेही घनदाट जंगलात 5 वाजताच गडद अंधार. आता सर्वांनी झोपण्याची तयारी सुरू केली. सर्वांनी गरम कपडे स्वेटर पारीधान करून सगळेच जण एस्किमोसरखे दिसायला लागलो हिमाचलचे संध्याकाळचे वारे अतिशय भयानक थंडी आणनारे असतात. सर्वांना जवळची सामुग्री तुटपुंजी वाटायला लागली. स्लिपिंग बॅग उघडल्या एकतर त्या पिशव्यामधुन झापता येईनात्या झोपेच्या पिशव्यामधुन झोपण्याचे एक शास्त्र आहे. गादी फाडुन आत घुसल्यासारखे त्या पिशवीत घुसुन गळयापर्यंत नाडया बांधुन घ्यायच्या आणि डोक्यावर टोपडे ओढुन कान डोळे नाकपुडया उघडया ठेवायच्या पायात मोजे आत पायजमा गरम विजार पून्हा गरम शर्ट. एवढा साजशृंगार करून आम्ही त्या स्लिपींग बॅगमधे घुसायचा प्रयत्न करता करता जेरीला आलो आधीच हवा प्रचंड थंड पून्हा तंबुत लाईट नाही बरे बिछानाही तोच पांघरूणही तेच बॅगमध्ये शिरल्यावर पून्हा हातपाय पसरायची सुद्धा सोय नसते. बाहेर थंडीचा पारा झरझरखाली जात होता थंडीचा ईतका बंदोबस्त करूनही पोटातुन भात शिजल्यासारखी थंडी शिजुन येत होती बरे बाहेर निघावे तर बाहेर पूर्ण अंधार. अशा घनदाट अरण्यात आकाशात चंद्र कसा दिसतो बघण्याची ईच्छा होती पण आमची अवस्था अवघडलेल्या बाळंतिणीसारखी झालेली. मध्यरात्री याकच्या गळयातल्या घण्टया वाजायच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठलो खरेतर शयनमंजुषेतून बाहेर पडणे ही एक सर्कसच होती. ती केली. ईतर मंडळी ढाराढूर झोपलेली आन्हिक उरकावे म्हणुन तंबुबाहेर डोके काढले सकाळचे पाच वाजले होते पण प्रकाश सर्वत्र फाकला होता. कॅप्टन स्वयंपाकी कुमारच्या स्वंयसेवकाची हालचाल सुरू झाली होती. अशा थंडीला न जुमानता ते सर्वासाठी चहा नास्ता हयाची तयारी करीत होते. जिथे स्वतःचे आन्हिक उरकणे हाच कष्टदायक प्रकार असतो तिथे फक्त ट्रेकर्सचे कौतुक हिम्मत वाढाण्यासाठी हे लोक स्वतःच्या ंगावाहुन इतक्या दूर येतात व पुन्हा महिनाभर राहतात ऋषीच्या तपस्येपेक्षाही महान तपस्या आहे. चहा नास्ता आला पूर्ण प्रवासात जे पुरी भाजी छोले भटोरे बटाटे भाजी देतात या खादयसामुग्रीची बेस कॅम्पवरूनवरपर्यंत पोहचती करणे ही खरोखरच कमाल आहे. कुमक आणने व नेणे हया भयाण उंचीच्या डोंगराळ भागात खुप कठीण आहे.

तिसऱ्या दिवशी आम्हाला सैनिकाप्रमाणे सर्व शस्त्र अस्त्र समवेत जिरटोप म्हणजे आमच्यासाठी कानटोपी शस्त्र म्हणजे लाकडी काठी पाठीवर रॅकसॅक त्यात पुढील पाच दिवससाठी लागणारे सर्व कपडे आवश्यक सामान तेही नऊ किलो पर्यंत पाठीवर लादले आणि ख-या युदधासाठी सज्ज झालो. आता आमचा संबध मुलकी जगाशी तुटला होता. साचेनशौकाझोण्ग्री ताण शिंगलाम्हूणीही मुक्कामाची ठिकाणं.. झोण्ग्री पासूनच बर्फ.. स्नो फॉलसुरूवात झाली. रोज साधारण 1000 मी उंच आणि 10 ते 15 किमी पायी प्रवास.जशी जशी उंची वाढत गेलीतशी थंडी वाढत गेली.21 डॉक्टर्स असल्यामूळे औषधी साठा व इतर सामग्री बरोबरच होती. तरी झोण्ग्रीला एक मुक्काम जास्तीचा करावा लागलाकारण त्या उंचीवरसगळयांना हाय अल्टीटयूड सिकनेस मुळे प्रत्येकाला डोकंदुखीमळमळीची सुरूवात झाली होतीसगळेच मनातून धास्तावले. त्यावेळेस डॉ. चंदू व डॉ. खटींग हयांनी गावराणी गप्पांनी मनोबल वाढवले. साधारण 600 मी उंचीवर झोण्ग्री टॉप येथुन कांचनजुंगा प्याण्डिमथ्री सिस्टर्सया पर्वतांच्या शिखराचे दर्शन घेण्यासाठी आम्हाला जायचे होते.बर्फ पडलेलातापमान उणे 10. हातात दिलेल्या काठयांची मदत घेत भल्या पहाटे 3 वाजता हेड लाइटच्या उजेडात प्रवास सुरू झालाझोण्ग्री टॉप गाठलंअंधारात कळलंच नाही की आपण किती उंच आलोत.

सकाळी सहा वाजले असतील. अक्षरशः डोळयावर विश्वास बसत नव्हताशुभ्रधवल हिमशिखरे व त्यावरपडलेली सोनेरी किरणे .चहूबााजुंनी ढगांचा पहारा. निसर्गाचा अद्भुत नजारा. कल्पानातीत. झोण्ग्री ते थानसिंग 14 किमी अंत्यंत खडतर चढाई. हिमालयात साधा भूप्रदेश कुठेच नाही.ज्यामार्गातुन ट्रॅकिंगला जायचे असते तो मार्गही बिकट तरी असला तरी निसर्गसुदंर असतो.जसं जसं वरती जात होतोततशी झाडे खुरटी होत होती आणि त्याबरोबरच ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत होतं.थोडं चाललं की दम लागणेआणि थांबलं की थंडी वाजणेअशा विचित्र परिस्थितीत आम्ही अडकलो. चांगलं सुखा सुखी आयुष्य सोडून मी इकडे का आलोऋ ऋ असा एकही ट्रेकर नसेल ज्याच्या मनात हा विचार आला नसेल.परंतू हे खरंच आहेजसं जसं आपण हिम सागराकडे जातोतशी तशी ती शिखरं आपल्याला साद घालतातआव्हान करतातआणि आपली पावलं आपोआप पुढे पडत असतात. मग उंचीबर्फहवाऑक्सिजन याचा विचार न करता.थांगसिंग चा मुक्काम करून. सकाळी 7 वाजताशिवाजी महाराज की जय च्या घोषणा देतजथ्या पुढे निघाला. कांचनजूंगा दिसत होतंजोश सगळयांचा वाढला होता. आमची लाम्हूणीच्या दिशेने चढाई चालु होती. तेवढयात सुमन आमचा एक गाईड धापा टाकत आला म्हणाला. सरजी वहां एक आदमी आखरी सांसे गिन रहा है ! आपमेसे जो डॉक्टर है उन्हे बुलाओ. मी..डॉ.टेंगसे नांदेड. आणि डॉ.केदार खटिंग परभणी. आम्ही तिघं लग बगीणेत्या टेंटकडेअक्षरशः पळतच गेलोपाहिलं तर साधारण चाळीशीतला तरूणटेंटमध्ये गंभीर अवस्थेत पडलेला होताश्वासोच्छास जवळ जवळ थांबेलेला. घेणंही त्याला अवघड जात होतंखरखर छातीतून आवाज येत होता. नाडी दाब पुर्णत ःकमी.एका टे्रकर ला हग्हि ाल्ततिुदए स्च्किन्एस्स्फटका होता हा. ठिकाणी आल्यावरफुफूसात पाणी जमा होऊन ऑक्सिजन च प्रमाण कमी होतं आणि श्वसन प्रक्रिया बिघडते.आता आमच्यातील टे्रकर एैवजी डॉक्टर जागृत झाला.रॅकसॅकमधील शरीरामधील ऑक्सिजन मोजायच यंत्र म्हणजेच पल्साक्स काढले.

ऑक्सिजनच प्रमाण फक्त 38त्इतक्या थंडीत आम्हालाच घाम फुटला. अतिदक्षता विभागात अनेक यंत्र व परिचारीका असतात पण ईथे घनदाट जंगलात कसे करावे. आमच्याकडे बुडेकॉर्टचा स्प्रे अन्‌ डॉयमॉक्स औषधी आणि आमचे गरम कपडे त्याच्या अंगावर टाकुन गरम करायचा प्रयत्न केला. अर्ध्यातासानंतर ऑक्सिजनच प्रमाण वाढु लागले. मृत्युच्या दाढेतुन वाचवल्याचे समाधान भेटले. त्याला खालच्या टेंटमध्ये घेवुन जाण्यासाठी सुचना केली पण स्ट्रेचरचा प्रश्न उद्भवला. पटकन लाकडाच एक स्ट्रेचर बनवूनचार जणं अक्षरशः त्याला घेवूनखालच्या दिशेने पळत सुटलेआम्हाला खात्री होतीखाली गेल्यावरर्23 तासात तो बरा होईल. ईकडे आमच्या बाकी मेंबर्सच्या मनात धाकधुक, ़व्याकुळता व प्रचंड भीती निर्माण झाली.पण काही वेळातच सगळयांचे मनोबल डॉ.केदार खटींग यांनी वाढविले. पुढचा शेवटचा मुक्कामलाम्हुणीलाआमच्या अगोदर किचन स्टाफने पोहचूनगरम गरम चहा व मॅग्गी ची सोय करून ठेवली होती.टेंट लावण्यात आले. कांचनजुंगा आणि पण्डिम या पर्वताच्या पायथ्याला अगदी स्वर्गातअसल्याप्रमाणे.साधारण 1300 मीटर उंच जायचं होतं. भल्या पहाटे 3 वाजता ला उठून. अंधारात फक्त हेड लाईटचा प्रकाश, काठी आणि सगळयांच्या मनातील औैत्सुकता गोयचला पास च्या दिशेने निघालो. तापमान उणे 15जोराचा वारा.सर्वात कठीण रस्तात्यामुळे एकदम पाय घसरला की तोंडावर कुठे आपटु याचे काही गणितच नाही काही जागेवर निमुळता रस्ता बाजूला खोल दरी बाजुला पूर्ण बर्फ. कांचनजुंगाच्या शिखरावर पोहचलो. जिथून पूढे जायची सिक्कीम ग्ेव्.ची परवानगी नव्हती. बर्फाच्छाादित शिखरांवर सुवर्णकणांचा वर्षाच होत असेल अशी सोनेरीसूर्याची किरणं कांचनजुंगाला वंदन करणारी. सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सृष्टी स्वर्गच अवतरला आहे असे वाटते.गाईडच्या आदेशाला न जुमानता मी हातातला ग्लोव्हज काढले हा नजारा कैद करावा म्हणून. परंतू क्षणातच आपला हात मनगटापासून पुढे आहे की नाहीकळेनास झालेपटकन ग्लोव्हज चढवले. शोकाच्या मुक्कामी तो पेशंट भेटलाअक्षरशा पाया पडला. कलकत्याचा मोठा व्यापारी होता तो. या वर्षातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण..शोका लाघरच्यांशी सहा दिवसांनंतर संपर्क झालाबरेच जण भावूक झाले होते. बारा दिवसानंतर घरी पोहचलो.खरेतर आयुष्य म्हणजे पुनरूक्ती ब्रेकफास्ट अंाघोळ दुपारचे जेवण आलटुन पालटुन केलेल्या त्याच भाज्या, तीच कणीक, तीच डुलकी, तोच चहा हा झाला एक दिवस प्रतिक्षणी नवाजन्म घेण्याची शक्ती मनाजवळ असते पण त्याला ते शिकवाव लागत निसर्गात निर्झर झरा वन उपवने स्वतःसाठी फुलत असतात ट्रेकिंगमध्ये मनाची ताकद निसर्ग प्रतिक्षण वाढवत असतो एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या तो शिकतो पूर्ण आयुष्य आपण प्लॉट, पदवी नोकरीचे आरक्षण करत मुख्य आंनदाला पाारखे होतो. आयुष्यभर रूसवे फुगवे व अभिमान ला जोपासून ठेवतो. पणट्रेकिंगमध्ये कळते एक ग्लास, एक टिफीन, एक ब्लॅकेट व मिंत्राच्या प्रेमाची शक्ती असली तर आंनद लूटू शकता हे लक्षात येते क्षणनक्षण निसर्गाच्या सानिध्यात राहता येते.

…. शब्दांकनं- डॉ.अर्चना लक्ष्मीकांत बजाज

You may also like

Popular News