जिल्ह्याच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

12 तालुक्यात घट तर 4 तालुक्यात किंचीत वाढ

जिल्ह्याच्या पाणी पातळीची तपासणी जिल्हा भुजल संरक्षण विभागाकडून वर्षातून 4 वेळा केली जाते. यात मार्च अखेरपर्यंत जिल्ह्याच्या पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये 12 तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी घट झाली आहे तर उर्वरी ीत 4 तालुक्यात कंचित वाढ झाल्याची अकडेवारी समोर आली आहे.

जिल्हा भुजल संरक्षण विभागाच्या कार्यालयाकडून जिल्ह्यातील पाणी पातळीची तपासणी वर्षातून 4 वेळा केली जाते. जिल्ह्यात भुजल पातळी तपासणी करण्यासाठी 134 निरिक्षण विहिरी आहेत. यापैकी कांही विहिरी बुजल्या आहेत. आहेतत्या विहिरीतून सप्टेंबर, जानेवारी मार्च आणि मे असे चार महिन्याच्या अखेरीस पाणी पातळीचे निरक्षण करून जिल्ह्याच्या पाणी पातळीत किती घट झाली आणि किती वाढ झाली याची तपासणी केली जाते. मागील तीन वर्षाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराचे कामे हाती घेण्यात आली होती. याच कामाची फलश्रुती म्हणून जिल्ह्याच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र 2018 च्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या कालावधीत प्रर्जन्यमान समाधानकारक झाले नव्हते. यामुळे पाणीस्त्रोतात वाढ झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील 12 तालुक्यात मार्च अखेरीस मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक घट मुखेड तालुक्यात 1.63 मिटरने घट झाली आहे. यापाठोपाठ देगलूर तालुयात 1.58 मिटर, धर्माबाद 1.13, लोहा 1.08, नांदेड 0.88 , बिलोली 0.85, किनवट 0.79, माहूर 0.42, हिमायतनगर 0.31, उमरी 0.18, मुदखेड 0.17 आणि भोकर 0.05 सरासरी 0.51 मिटर पाणी पातळीत घट झाली आहे. तर त्याच तुलनेत हदगाव तालुक्यात 0.65, कंधार 0.14, नायगाव 0.10 आणि अर्धापूर तालुक्यात 0.01 मिटर या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही वाढ येणाऱ्या मे महिन्याच्या तपासणीत कमी होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही. यामुळे 2019 चा उन्हाळा तिव्र उन्हाळा जाणवणार असल्याचे चिन्ह सध्या तरी दिसून येत आहे.

जिल्ह्यातील 134 निरिक्षण विहिरीपैकी 126 विहिरींची तपासणी करण्यात आली. यापैकी 86 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली तर 34 विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरीत येणाऱ्या काळात नांदेडकरांना तिव्र पाणी टंचाई सामाना करावा लागणार आहे. सध्या स्थितीत मुखेड,देगलूर, किनवट, लोहा या तालुक्यात टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मे अखेरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात टॅंकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

You may also like

Popular News