डांबर घोटाळ्यातील अखेरचा कंत्राटदार तीन दिवस पोलीस कोठडीत

सात महिन्यापासून 11 कोटीपेक्षा जास्त रक्कमेच्या डांबर घोटाळ्यातील फरार असलेल्या शेेवटच्या आरोपीला पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके यांनी मोठ्या शिताफिने अटक करून अत्यंत जलदगतीने न्यायालयात हजर केल्यानंतर चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.गवळी यांनी डांबर घोटाळ्याचा आरोपी असणाऱ्या शेवटच्या कंत्राटदाराला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

तीन सप्टेंबर 2018 रोजी दाखल झालेल्या डांबर घोटाळा प्रकरणात मनोज मोरे, भास्कर कोंडा, चंद्रकांत संत्रे या तिघांना पोलीसांनी अटक केली. आजच्या परिस्थितीत त्यांना जामीन मिळालेला आहे. या प्रकरणातील एक कंत्राटदार एस.जी. पद्मावार यांना उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन दिला. पद्मावार विरुध्द कांही दिवसांपुर्वी नव्याने एक गुन्हा दाखल झाला आहे. तो सुध्दा डांबर कामाशी संबंधीत आहे. या गुन्ह्यातील एक कंत्राटदार सतीश देशमुख याच्याविरुध्द पोलीसांनी दोषमुक्ती अहवाल पाठवला आहे. इतरांविरुध्द न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले आहे.

7 महिन्यांपासून फरार असलेला कंत्राटदार महम्मद मोईजोद्दीन महम्मद सलीमोद्दीन यांनी अटपुर्व जामीन मिळविण्यासाठी केलेली धडपड कोठेच यशस्वी झाली नाही. महम्मद मोईजोद्दीनला 49.99 मेट्रीक टन डांबरचे काम देण्यात आले होते. त्याने 69.55 मेट्रीकटन डांबर आणून काम केल्याचे दाखविले. या प्रकरणात शासनाने ठरवलेल्या डांबर कंपन्यांकडून डांबर न आणता इतर ठिकाणाहून डांबर आणले. आणि शासकीय कंपन्यांची बिले जोडून निविदेचे बिल उचलले. या डांबर घोटाळ्यात 11 कोटी 63 लाख 82 हजार 566 रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कंत्राटदारांवर आहे. मोहम्मद मोईजोद्दीनला नांदेड जिल्हा न्यायालयाने त्यांच्या मुलीचे लग्न पार पाडण्यासाठी कांही दिवसांचा अंतरीम आदेश दिला होता. पण पोलीसांना मोहम्मद मोईजोद्दीन सापडत नव्हता.

धर्माबादहून प्रसारीत होणाऱ्या एका वर्तमानपत्रात आज 12 एप्रिल रोजीचा मुहूर्त ठरला असून मोहम्मद मोईजोद्दीन पोलीसांना शरण जाणार असल्याचे भाकित व्यक्त केले होते. आज 11.52 वाजता पोलीसांनी मोहम्मद मोईजोद्दीनला अटक केली आणि त्या वर्तमान पत्राचे भाकित खरे ठरले. “मोदक’ लागण पोलीस उपअधिक्षक कार्यालयासुध्दा लागली असल्याचे त्यावर्तमान पत्रात लिहिलेले आहे. सत्य मोदकांचा प्रेमी देवच जाणो. 11.52 वाजता अटक केल्यानंतर पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके, पोलीस उपनिरिक्षक यु.जी. उगले, पोलीस कर्मचारी अनिल गायकवाड, उमेश राठोड, शिवाजी नाईक आदींंनी अत्यंत शिताफीने पकडलेल्या मोहम्मद मोईजोद्दीनला दुपारी 3.20 वाजता न्यायालयात आणले. न्यायालयासमक्ष मोईजोद्दीनची हजेरी 4 वाजता लागली. अत्यंत परखड मत मांडत अभिजित फसके यांनी या प्रकरणातील आगोदर अटक केलेला कंत्राटदार चंद्रकांत संत्रे व मोहम्मद मोईजोद्दीन यांच्या बॅंक खात्यामध्ये आपसात आर्थिक व्यवहार झालेला आहे. त्याची तपासणी करणे आहे. यासाठी पोलीस कोठडी द्यावी. सहाय्यक सरकारी वकील ऍड. ए.एम. सौदागर यांनी हे प्रकरण शासनाशी संबंधीत आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेच्या पैशाची संबंधीत आहे असे सांगत पोलीस कोठडीची मागणी केली. कंत्राटदार आरोपी मोहम्मद मोईजोद्दीन यांच्यावतीने ऍड. रमेश परळकर यांनी नवीन जीआर जुन्या व्यवहारांवर लागू होत नाही. असे सांगून पोलीस कोठडी देण्यासारखा प्रकार या प्रकरणात नसल्लयाचा मुद्दा मांडला. युक्तीवाद ऐकून न्या. गवई यांनी कंत्राटदार महम्मद मोईजोद्दीन महम्मद सलीमोद्दीन यास तीन दिवस, 15 एप्रिल 2019 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

…..रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like

Popular News