दारु पिलेल्या शिक्षकाविरुध्द आचार संहिता भंगाचा गुन्हा

एका शिक्षकाने दारु पिऊन निवडणूकीचे काम करणार नाही असे सांगितल्याने त्याच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा देगलूर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

दि.11 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता देगलूर तालुका क्षेत्रातील लोकसभा निवडणुक संदर्भाने माझी नोकरी रद्द करा अशी मागणी दुरध्वनीवरुन शिक्षक अशोक हनमंत देशमुख यांनी केली. माझी ड्युटी रद्द केली नाही तर मी जिल्हाधिकारी आणि तहसीदार यांच्या नावाने चिठ्ठी लिहुन आत्महत्या करली अशी धमकी दिली. तो दारु पिऊन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली असे तहसीलदार अरविंद बेळगे यांनी तक्रारीत लिहिले आहे. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक क्षीरसागर करीत आहेत. या संदर्भाची बातमी आपल्या प्रेसनोटमध्ये देतांना पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने या बातमीत पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांचा नमुन केलेला मोबाईल क्रमांक 9011391557 हा लोहा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरिक्षक क्षीरसागर यांचा आहे.

You may also like

Popular News