14 वर्षीय बालकाची आत्महत्या

मौजे फुलवळ ता.कंधार येथे एका 14 वर्षीय बालकाने गळफास घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कंत्राटदार महेश मल्लिकार्जुन मंगनाळे यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार दि.11 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता फुलवळ ता. कंधार येथे प्रतिक बापुराव मंगनाळे या 14 वर्षीय बालकाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन घरातील ओसरीवर स्वत:गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कंधार पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यू दाखल केला असून तपास पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत.

एक चोरी एक जबरी चोरी ; 1 लाख 65 हजाराला चुना

लोहा येथे सेवानिवृत्त नायब तहसीलदाराची नजर चुकूवून चोरट्यांनी 1 लाख 50 हजार रुपये लांवले आहेत. भाग्यनगर येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 15 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.

कंधार येथे राहणारे सेवानिवृत्त नायब तहसीलदार रामू गंगाधर तुपकर हे कांही कामासाठी लोहा येथे आले होते. लोहा कंधार रस्त्यावरील राधाबाई हॉटेल येथे ते चहा पित असतांना त्यांनी आपल्या बाजूलाच काळ्या रंगाची हॅंडबॅग ठेवली होती. कोणी तरी चोरट्यांनी ती नजर चुकवून चोरून नेली आहे. त्या बॅगमध्ये 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम होती. लोहा पोलीसांनी या प्रकरण गुन्हा दाखल केला असून परीविक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक परिहार अधिक तपास करीत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत पुष्पाबाई अशोक गुट्टे या 45 वर्षीय महिला 11 एप्रिल 2019 रोजी सकाळी 4.45 वाजता मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. शहरातील कैलास नगरमध्ये असलेल्या सहारा ईलेक्ट्रीकलच्या दुकानासमोरून जात असतांना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसुत्र 15 हजार रुपयांचे बळजबरी चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक अनिता चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

You may also like

Popular News