क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

दीपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस.एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सस्थेचे सचिव कपील नरवाडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास सर्व प्रथम महात्मा ज्योती फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले हे भारतीय शिक्षणाचे जनक आहेत. त्यांनी मोफत शिक्षणाचा पाया घातला.आजही ते कायम आहे त्याचा फायदा पालकांनी घेवून आपल्या पाल्यांना उच्च शिक्षीत करावे असे आवाहन कपील नरवाडे यांनी यावेळी केले. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवन कार्यावर मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस.एन. राऊत यांनी यावेळी प्रकाश टाकला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक सय्यद जैनोद्दीन, प्रल्हाद आयनेले, श्रीधर पवार, सौ. यशोदा पैंजने, बालवाडी शिक्षीका, सौ. बुध्दांगणा गोखले यांच्यास विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

You may also like

Popular News