मेहंदी स्पर्धेतून मुलींनी दिला मतदानवाढीचा संदेश

नुकत्याच झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात केवळ ५६ टक्के मतदान झाले. विदर्भातील सात मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी फारशी समाधानकारक नाही.त्यामुळे मतदान जनजागृती जोर पकडणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ तारखेला असून नांदेड लोकसभा मतदारसंघातील ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघ अंतर्गत जवळ देशमुख येथे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घाटकर यांच्या संकल्पनेतून जि. प. शाळेत कुमारवयीन मुलींसाठी मेहंदी स्पर्धा घेऊन मतदानाचा संदेश देण्यात आला.

प्रशासकीय पातळीवरून मतदान वाढीसाठी जनजागृती अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले. परंतु विदर्भातील मतदानाची टक्केवारी लक्षात घेता ती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसते. मतदानवाढीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून किशोरवयीन मुलींकरिता मेहंदीस्पर्धा घेण्यात आली. त्यात साक्षी झिंझाडे , प्रियांका गोडबोले, अंजली झिंझाडे, दिव्या गच्चे, प्रतीक्षा गोडबोले, अंजली गोमस्कार, शुभांगी गोडबोले, अक्षरा गोडबोले, नंदिनी वाघमारे, श्रावस्ती गच्चे, श्रुती मठपती, साक्षी गच्चे, कोमल चक्रधर या मुलींनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या करून शेजारील दगडगाव,बोरगाव,जवळा पु , शेवाडी,बेटसांगवी,कपिलेश्वर सांगवी,खडकमंजरी आदी गावातही जाऊन मेहंदी स्पर्धेच्या माध्यमातून जनजागरण करणार असल्याचे ढवळे जी.एस.यांनी सांगितले. या फिरत्या चमूमध्ये राणी गोडबोले, सरिता गच्चे, पल्लवी गोडबोले, साक्षी गोमस्कार, संघमित्रा गच्चे, सुनीता गच्चे, सीमा रावेकर, पूजा गोडबोले, वैष्णवी गोडबोले या परीश्रम घेत आहेत.

You may also like

Popular News