कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिवलचे आयोजन

कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन (केटीओ)द्वारे मुंबईतील सर्वसाधारण नागरीक आणि इच्छुक प्रवाशांकरिता ‘कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिव्हल’चे आयोजन मुंबईतील हाय स्ट्रीट फिनिक्स येथे १३ आणि १४ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले आहे. दोन दिवस चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये दक्षिण कोरियातील अन्नपदार्थ, संस्कृती, संगीत, पर्यटन इत्यादी अनुभवांचे प्रदर्शन करण्यात येते. त्यासोबतच मुंबईच्या पीवीआर जुहू भागात कोरिया कल्चर सेंटरद्वारे कोरिया मूव्ही विकएंडचे आयोजनही करण्यात आले आहे.

याठिकाणी येणाऱ्यांकरिता फेस्टिव्हलच्या प्रमुख आकर्षणांमध्ये सर्वोत्तम कोरियन कलाकारांचा समावेश असेल, ज्यामध्ये इन२इट, अलेक्झांड्रा, क्वीन अँड गॅम्बलर्स क्रूचा सहभाग राहील. इथे भेट देणाऱ्यांना पारंपरिक कोरियन पेहराव-हानबोक वेअरिंगचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. या पेहरावाच्या नावात कोरियन वर्ण हँगेउलचा समावेश आहे, इथे मास्क पेटींग, फेस पेंटींग, फूड टेस्टींग अशा मजामस्तीसमवेत अस्सल कोरियन खाद्यपदार्थ जसे की, बिबिमबाप (भाताचा प्रकार) आणि सेजेओंग्वा (दालचिनीयुक्त पेय) ची चव घेता येईल. त्याचप्रमाणे एटी सेंटर आयोजित स्थानिक कोरियन नाश्त्याचे नमुने चाखता येतील.

याठिकाणी काही निवडक झोन तयार करण्यात आले आहेत. जसे की, हल्लयु झोन, परफॉरमन्स झोन, एक्सपिरिअन्स झोन, व्हीआर अँड कॅलिग्राफी झोन, फोटो झोन, गेम झोन, फूड झोन, रिजनल टुरिझम झोन आणि रिडम्पशन झोन तुम्हाला ‘इमॅजीन युअर कोरिया’ (तुमच्या मनातील कोरियाची कल्पना) करण्याची संधी देणारी ठरतील. हा फेस्टिव्हल सर्वांसाठी मोफत आहे. भारतीय ट्रॅव्हल एजंट इवेंटमध्ये उपस्थित असतील आणि कोरिया ट्रॅव्हल पॅकेजवर विशेष ऑफर्सही उपलब्ध करून देतील. याठिकाणी भेट द्यायला येणाऱ्यांना आरटीओ झोनमध्ये स्टँप टूर घेऊन मोफत के-फेस्ट मर्कंडाईज सोबत नेता येणार आहेत.

कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनचे संचालक श्री. क्वॉन जाँग सूल म्हणाले की, “आमच्यासाठी कायमच भारत हा एक महत्त्वपूर्ण देश आहे. नियमित प्रवासी तसेच एमआयसीई बाजारासाठी दक्षिण कोरियाकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला आशा वाटते की, न लक्षात घेतलेल्या भरपूर क्षमता आहेत. हा दोन दिवसांचा महोत्सव भारतीय पर्यटकांचा दक्षिण कोरियात प्रचार-प्रसार आणि जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आम्ही भारतीय पर्यटकांमध्ये दक्षिण कोरियाचा प्रचार व्हावा म्हणून गुंतवणूक करू. हा एमओयु आमच्या या प्रयत्नाला हातभार लावेल. भारतीय प्रवाशांकरिता कोरिया ही प्रथम पसंती ठरावी याकरिता आऊटबाउंड टूर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियासोबत दीर्घकालीन भागीदारीकरिता आम्ही उत्सुक आहोत.”

You may also like

Popular News