रक्तदान करून प्रभूश्रीरामांना युवकांनी केले वंदन

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामनवमी आणि हिंदू एकता दीनानिमित्त हिमायतनगर (वाढोणा) नगरीतील छत्रपती शिवाजी चौकामधील युवकांनी रक्तदान देऊन श्री राम… जय राम… जय जय… रामच्या जयघोषात वंदन केले आहे.

शहरातील रामराज्य मित्र, रामभक्त मित्रमंडळ, टायगर ग्रुप, शिवनेरी मात्र मंडळ, शंभूराजे मित्रमंडळ, विद्रोही मित्रमंडळ व शहरासह ग्रामीण भागातील रामभक्त युवकांनी संयुक्तिक रक्तदान शिबिराचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये केले होते. या शिबिराचे उदघाटन पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित भाजप जिल्हा चिटणीस सुधाकर पाटील, वैद्यकीय आघाडी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रसाद डोंगरगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान, तालुका सरचिटणीस यलप्पा गुंडेवार, डॉ. गणेश कदम, सौ.लताताई मुलंगे, रेल्वे उपभोक्ता समितीस सदस्य साईनाथ कोमावार, पत्रकार अनिल मादसवार, दिलीप शिंदे, रामभाऊ सूर्यवशी, गजानन हारडपकर, विपुल दंडेवाड, सचिन कोमावार, विकास नरवाडे, आदींसह अनेक मान्यवरांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेस वंदन केले. यावेळी गुरु गोविंदसिंघजी रक्तपेढी नांदेडचे डॉक्टर कनकदंडे व त्यांच्या सहकार्यांनी रक्तसंकलन करण्याचे कार्य केले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी गोविंद शिंदे, गजानन गायके, सुरज दासेवार, शितू सेवनकर, सुधाकर भोयर, चिनी नरवाडे, बालाजी मादसवार, आदींसह अनेक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. सदर शिबीर व रामनवमी कार्यक्रमाचे वृत्त लिहीपर्यंत ३१ युवकांडी रक्तदान केले होते.

You may also like

Popular News