हिमायतनगरात मर्यादा पुरुषोत्तम रामजन्मोत्सव साजरा

बजरंग दलाच्या बाईक रैलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले

हिमायतनगर (वाढोणा) शहरातील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, परमेश्वर मंदिर, साई मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिरसह शहर तालुक्यातील सर्वच देवी – देवतांच्या मंदिरात चैत्र शुद्ध नवमीच्या दिनी दि.१३ शनिवारी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने येथील बजरंग दल शाखेच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य अशी बाईक रैली काढली. यामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी १२ वाजता शहरातील सर्वच देवी – देवतांच्या मंदिरात राम नामाचा जप करीत प्रभू श्री रामचंद्राच्या जीवन चरित्रावर आधारित भक्ती गीते महिला व पुरुष मंडळीनी सादर केली. तर बजरंग दलाच्या युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रभू रामचंद्र कि जय.. सियावर रामचंद्र कि जय.. नावाचा जयघोष करीत मोटार सायकल रैली काढली होती. यावेळी युवकांनी भगवे झंडे लाऊन रैलीत सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीराचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कुणाल राठोड, राम नरवाडे, विठ्ठल ठाकरे, संतोष गाजेवार, बजरंग दलाचे गजानन चायल, अमोल धुमाळे, बंडू अनगुलवार, देविदास शिंदे, यांच्यासह शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता. सादर मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने निघून परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर समारोप करण्यात आला. यावेळी मंदिराच्या वतीने रैलीमध्ये सामील झालेल्या युवकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तर महावीराचंद श्रीश्रीमाळ यांच्या वतीने रैलीमध्ये सहभागी झालेल्या युवकांना मिठाई भरून तोंड गोड करत रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

शहरातील येथील विजय बंडेवार यांच्या फार्म हाउस वरील श्री साई मंदिरात, श्रीराम, परमेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमाने प्रभू श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शेकडो महिला, पुरुष भक्तांनी हजेरी लावली होती. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील सरसम बु, सिरंजणी, कामारी, पोटा बु, कारला, सवाना ज., बोरगडीसह सर्वच गावातील मंदिरामध्ये भजन – कीर्तन अश्या भक्ती संगमात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

You may also like

Popular News