छप्पन भोग स्वीट्सच्या चौथ्या शाखेचे शानदार उद्घाटन

नांदेडमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या मिठाई आणि नमकीन पदार्थांनी नांदेडकरांचे ह्दय जिंकणाऱ्या छप्पन भोग स्वीट्स या दुकानाची चौथी शाखा १३ एप्रिल रोजी छत्रपती चौकात उघडण्यात आली आहे. या शाखेचे उद्घाटन कारसेवावाले गुरुव्दारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, तख्त सचखंडचे जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, प.पू.संत जगदीशजी महाराज आणि प.पू.संत रामशरणदासजी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भगवानसिंह राजपूरोहित, प्रभूसिंह राजपूरोहित, नारायणसिंह राजपूरोहित, परमेश्वरसिंह राजपूरोहित, गिरीधारीसिंह राजपूरोहित, गोविंदसिंह राजपूरोहित आणि जितेंद्रसिंह राजपूरोहित यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास दडूशेठ पुरोहित, मनोज भारतीया, मोहनसिंह चढ्ढा, जगदीश राजपूरोहित बडोदावाले, गिरीधारी साकला, सोनूसिंह परमार आदी प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होती. आपल्या संयमशील, सस्मित आणि सचोटीच्या शैलीमुळे नांदेडच्या खवैय्यांमध्ये लोकप्रिय झालेले राजपूरोहित कुटुंब गेल्या पंधरा वर्षापासून नांदेडकरांच्या जिभेचे लाड पुरवीत आहेत. छप्पन भोगमध्ये मिठाई व नमकीन तयार करणारे कारागीर हे कलकत्ता, राजस्थान मधील आहेत. राजपूरोहित यांनी नांदेडमध्ये मिठाईच्या घाऊक व्यापाराने आपली सुरुवात केली. आज त्यांची चार दुकाने आहेत. आणि किरकोळ व्यवहार (रिटेल) ही ते चांगल्या रितीने करीत आहेत. छत्रपती चौकात सुरु झालेल्या छप्पन भोग स्वीट्सच्या चौथ्या शाखेमुळे तरोडा खु., तरोडा बु., आणि काबरानगर, पावडेवाडी या भागातील खवैय्यांची चांगलीच सोय होणार आहे. या दुकानात नागरिकांना बंगाली मिठाई, राजस्थानी मिठाई, गुजराथ, कलकत्ता येथील मिठाई मिळणार आहे.

You may also like

Popular News