सोमवारी नांदेड येथे राहूल गांधी यांची सभा

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-आरपीआय-रिपाइं मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांच्या जाहीर सभेसाठी कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहूल गांधी यांची विराट जाहीर सभा नवा मोंढा मैदान येथे दि. 15 रोज सोमवार सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वाघमारे बोलत असताना म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाऐवजी घरा-दाराच्या व नातेवाईकांच्या गोष्टी अधिक केल्या. पंतप्रधान सध्या प्रचार सभेत मागच्या पाच वर्षांत काय विकास केला हे सांगण्यापेक्षा व पुढच्या पाच वर्षांत काय केले जाणार या गोष्टी सांगितल्या जात नाहीत, तर कोणाच्या घरात काय चालले याची माहिती जनतेसमोर देत आहेत. सध्या राज्यात वातावरण कॉंगे्रससाठी चांगले आहे. राज्यात सर्वाधिक जास्त मताधिक्याने नांदेडची जागा कॉंगे्रस पक्ष जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसने घोषीत केलेल्या न्याय योजनेमुळे भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. या न्याय योजनेत समाजातील मुख्य घटकाला प्रवाहात आणण्याचे काम या योजनेमुळे होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम हे करत आहेत. आरएसएसच्या बाबतीत कॉंग्रेसची भुमिका सुरूवातीपासून एकच आहे यांच्या भुमिकेत कधीही बदल झाला नाही, असे ठाम मत प्रदेश प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खा. अशोक चव्हाण यांच्या जाहीर प्रचारार्थ दि. 15 रोज सोमवार सायंकाळी 6 वाजता नवा मोंढा येथील मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय प्रभारी, राज्यातील काही पदाधिकारी यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे.

You may also like

Popular News