दारूबंदीतही वाई बाजारात दुकानदारा मार्फत दारूची खुलेआम विक्री..!

“सेटींग किंग” दुकानदाराने बसवले शासन आदेश धाब्यावर..!

शासनाने ड्राय डे चे वेळापत्रक जाहीर करून वारंवार सुचना दिलेल्या असतानाही वाई बाजार येथील देशी दारू विक्रेत्यामार्फत दुकानाबाहेरच देशी दारूची आज भल्या पहाटेपासुनच बिनदिक्कतपणे विक्री सुरू केली असून शासनाच्या सुचनांना धाब्यावर बसवून दारूबंदीत होत असलेल्या दारू विक्रीवर सिंदखेड पोलीसांची अप्रत्यक्ष मेहेरबानी असल्याचे बोलके चित्र पहावयास मिळत आहे.

शासनाने यापुर्वीच चालू महिण्यातील ‘ड्राय डे’ चे वेळापत्रक जाहिर केले असून आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनासह १७ एप्रिल महावीर जयंती (संपुर्ण दिवस), १९ एप्रिल गुड फ्राय डे (संपुर्ण दिवस), २७ एप्रिल शनिवार – संध्याकाळी 6 वाजल्यापासून (अंदाजे)
२८ एप्रिल रविवार – (संपूर्ण दिवस),
२९ एप्रिल सोमवार – संध्याकाळी 6 वाजेपर्यंत
१ मे – महाराष्ट्र दिन (संपुर्ण दिवस),
१८ मे – बुद्ध पौर्णिमा (संपुर्ण दिवस),
२३ मे, गुरुवार – संपूर्ण दिवस (मतमोजणीचा दिवस) या दिवशी ड्राय डे चे वेळापत्रक जाहिर केले आहे. परंतु वाई बाजार येतील ‘सेटींग किंग ‘ म्हणून प्रचलित असलेल्या देशी दारू दुकानदारामार्फत आज बंदच्या काळातही चक्क दारू दुकानाबाहेरच ८० रू. (180ml) अशा चढ्या दराने दारूची खुलेआम विक्री होत असून भल्या पहाटेपासुन मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होत असल्याने त्यातच अवघ्या ४८ तासांपुर्वी अवैध दारू भट्ट्या व विक्रेत्यांवर छापेमारी केल्याची घटना ताजी असताना वाई बाजार येथील हा महाभाग दारू विक्रेता चक्क दुकानाबाहेरच दारू विक्री करत असल्याने कायद्याची उघड पायमल्ली करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत मोठी सेटींग केल्याची चर्चा जोर धरू लागली असून यामुळे सिंदखेड पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

“याबाबत सिंदखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांचेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे लोकसभेसोबतच महामानवांच्या जयंतीदिनी शासन आदेश पायदळी तुडवुन नियमावलीची यत्किंचितही तमा न बाळगणा-या वाई बाजार येथील निगरगठ्ठ दारू दुकानदारावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.

…बाबाराव कंधारे, माहूर.

You may also like

Popular News