शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे- संगमेश्वर लांडगे

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने बाबासाहेबांना आभिवादन

मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे हे होते तर प्रमुख उपस्थिती टर्निंग पॉइंट अभ्यासिकेचे संचालक बाळासाहेब देसाई, संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष अशोक कदम यांची होती.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे डॉ. बाबासाहेब समाज बांधवांना सांगत. बहुजन समाजातील तरुणांनी आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवावं की मला या देशातील राज्यकर्ती जमात व्हायचं आहे ते स्वप्न आज बहुजन तरुण पाहतो का..? आणि बाबासाहेबाना आपेक्षीत लोकशाही या देशात नांदते आहे का..? या सर्व प्रश्नांवर आज विचारमंथन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून देशाची लोकशाही बळकट करूयात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करूयात या निश्र्चयासह विश्वरत्नास अभिवादन करूयात आणि हा जयंती महोत्सव विचारांच्या जागराने साजरा करूयात, असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांनी केले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाकोषाध्यक्ष गणेश शिंदे, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख स्वप्नील कापसे, द.तालुकाध्यक्ष हनुमंत कोल्हे , राम आनकाडे, रामदास डावकोरे, गोविंद डावकोरे आदींसह शेकडो सदस्य उपस्थित होते.

You may also like

Popular News