किनवट विधानसभा मतदारसंघ कार्यालयात टपाली मतदान

सुलभीकरण केंद्र ‘ सुविधा उपलब्ध

83-किनवट विधानसभा मतदारसंघासाठी अधिकारी /कर्मचारी यांची सेवा निवडणूक आयोगाच्या वतीने अधिग्रहित करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशा मतदारांना मतदान करण्यासाठी 15 – हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व 83 – किनवट विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात (आय.टी.आय. येथील तहसिल कार्यालय ) ‘टपाली मतदान सुलभीकरण केंद्र ‘ दि.16 व 17 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 05.00 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता सेवा अधिग्रहीत केलेले अधिकारी /कर्मचारी यांना टपालाद्वारे प्राप्त झालेल्या मतपत्रीकेसोबतच्या घोषणापत्रावर साक्षांकन करण्यासाठी राजपत्रित अधिकारी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूकीकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी /कर्मचारी यांनी नमुना -12 हा फार्म भरून दिला आहे. त्यांना टपाली मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. त्या हस्तगत करून ‘टपाली मतदान सुलभीकरण केंद्रा’ वर उपलब्ध करून दिलेल्या सुविधेचा लाभ घेऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करावे ; असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

You may also like

Popular News