किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज रविवारी (दि.१४) किनवट, गोकुंदा व परिसरात अत्यंत हर्षोल्हासात साजरी करण्यात आली.

जयंतीचा मुख्य सोहळा सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके व फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाले. महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामूहिक धम्म वंदना घेतली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यात आमदार प्रदीप नाईक, माजी आमदार भीमराव रामजी केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष इसाखान, के.मूर्ती, अरुण आळणे, दादाराव कयापाक ,प्रा.किशनराव किनवटकर, नारायणराव सिडाम, सोपानराव केंद्रे, सुधाकर भोयर, सुनिल इरावार, शकील बडगुजर, परमेश्वर पेशवे, अभियंता मनिष गवई, गिरीश नेम्मानीवार, अभय महाजन, डॉ.अंबादास कांबळे, प्रा.रविकांत सर्पे, गोकुळ भवरे, प्रकाश नगराळे, सुरेखा काळे, अशोकराव नेम्मानीवार, अॅड.सुभाष ताजने, मझहर, नौशाद खान, शेख अफरोज, जहिरोद्दीनखान, शुभांगी ठमके, प्राचार्य डॉ.आनंद भंडारे, प्रा. अरुण आळणे, प्रा.डॉ.सुनिल व्यवहारे, विजय जोशी, अॅड.दिव्या पाटील, गोवर्धन मुंडे, फसीउल्ला, यशवंत क-हाळे, उध्दव भवरे, कल्पना घुले, आनंद सरतापे, अॅड.सम्राट सर्पे, कृष्णावती धोटे, आशाताई कदम, सूर्यकांता सर्पे, शुभम भवरे, रमेश मुनेश्वर, भारत सर्पे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी निर्मिक पुरुष बचत गटाच्या वतीने अल्पोपहार व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले, तर संभाजी ब्रिगेड तर्फे प्रा.दगडू भरकड व बबन वानखेडे यांनीही थंड पाण्याचे पाऊच वितरीत केले.

∙ किनवट बसस्थानकामध्ये आगार प्रमुख मिलिंद सोनाळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. एस.टी.कर्मचारी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रकाश कांबळे यांनी आगारास बुद्ध मुर्ती भेट दिल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सामूहिक धम्मवंदना अनिल उमरे यांनी घेतली.

∙ जेतवन बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर येथे अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते पंचशील ध्वाजारोहण झाले. सूत्रसंचालन प्रा. सुबोध सर्पे यांनी केले.

∙ जयभीम नगर येथे पंचशील ध्वजारोहण नगरसेविका जिजाबाई मेश्राम यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन विजय वाघमारे यांनी केले. धम्मवंदना निवृत मुख्याध्यापक रामजी कांबळे यांनी घेतली. यशस्वीतेसाठी दीपक लोखंडे, संतोष पाटील, राहुल कानिंदे, मिलिंद लोकडे, सूरज पाटील,संजय देठे यांनी पुढाकार घेतला.

∙ पंचायत समितीमध्ये डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी पी.के.नारवटकर, कनिष्ठ सहाय्यक बी.डी.फोले, अधिकारी सुभाष पाटील, कनिष्ठ अभियंता मदने ,तुरेवाले, वसंत राठोड, मल्हारी शिंदे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

….अरुण तम्मडवार, किनवट.

You may also like

Popular News