लोहा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

लोहा शहरात भारतीय रत्न घटनेचे शिल्पकार प .पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात पंचरंगी व निळ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या मुख्य शहरातून बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सह भव्य मिरवणूक शहरातून निघाली.

जुना लोहा येथील त्रिरत्न बुद्ध विहारात उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम नगरसेवक छत्रपती धुतमल जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर महाबळे त्यांच्या हस्ते निळा व पंचरंगी ध्वजारोहण झाला नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पो नि मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहराच्या मुख्य रस्त्यावर भव्य मिरवणूक निघाली. ज्ञानदीप बुद्धविहारात नगरसेवक बालाजी खिलारे नगरसेवक पंचशील कांबळे डॉ ज्ञानोबा हनवते यांच्या हस्ते गुजरात झाले क्रांतीसुर्य बुद्धविहारात नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी हदय रोग तज्ञ डॉक्टर मिलिंद बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले इंदिरानगरात बळीराम थोरात सटवाजी गोडबोले यांच्या असते तर सुधार नगरात माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार नगरसेवक भास्कर पाटील पवार अरुण कांबळे तुकाराम कापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जुन्या लोह्यात काँग्रेस प्रभारी श्याम पाटील तेलंग माजी नगरसेवक उत्तमराव महाबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. जायकवाडी येथे बी बी गायसमुद्रे यांच्या हस्ते पूजा पाठ एस एन शिनगारे पुतळे , रत्नाकर महाबळे जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर महाबळे केशव तीडके सतीश निखाते सुधीर महाबळे अनिल धुतमल बापूसाहेब कापुरे बाळू थोरात कांबळे निखिल महाबळे यांच्यासह अनेकानी परिश्रम घेतले.

You may also like

Popular News