श्रीनिकेतन शाळेत महामानवाला अभिवादन

नांदेड शहरातील दिपकनगर भागात असलेल्या श्रीनिकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मूख्याध्यापिका डॉ. सौ. एस.एन.राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्या आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक के.आर. बनसरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली. विश्‍वभुषण,भारतीय राज्यघटनेचे शिल्कार, दिनदुबळयांचे कैवारी, उत्कृष्ट पत्रकार एक आदर्श समाज शिक्षक असे विविध पैलू बाबासाहेबांच्या बाबतीत सांगता येतील अशा महामानवांच्या ग्रंथाचे वाचन जो करतो तोच माणूस मानसासारखे जगातो तेंव्हा त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापिका डौ.सौ. राऊत यांनी केले. यावेळी के.आर. बनसरे, वाय.एल. थोरात, पी.जी.कळकेकर, श्रीमती उर्मिला सोनवणे, आदिंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक एन.एल. सोनकांबळे, सय्यद, व्हनसेट्टे, राठोड, इंगोले, पवार, मोगल, सोै. जगधने, सौ. सोनकांबळे, सोै. पैंजने, आयनेले, माळेगोव , पंडित, इसादकर, आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आयनेले यांनी तर उपस्थितांचे आभार व्हनसेट्टे यांनी मानले.

You may also like

Popular News