माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचे हात बळकट करण्यासाठी

काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडेंना प्रचंड मतांनी निवडून आणा – जवळगावकर

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि.१८ एप्रिल २०१८ रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या नावासमोरील पंजा निशाणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे. आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करावे असे आवाहन हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

ते नांदेड जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या पटांगणात दि.१४ एप्रिल रोजी आयोजित प्रचार सभेच्या मंचावरून बोलत होते. तत्पूर्वी माजी खा.सुभाष वानखेडे, मा.आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी, दुधड- वाळकेवाडी, करंजी, सरसम बु., पवना, आदेगांव, दरेसरसम, वाशि, दगडवाडी, महादापूर, जिरोना, सवना ज., रमनवाडी, चिचोर्डी, एकघरी, पार्डी, टेंभी आदी गावामध्ये मतदारांच्या गाठी – भेटी घेऊन संवाद तथा प्रचार दौरा करत काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष वानखेडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर रात्री ८ वाजता हिमायतनगर शहरात आयोजित प्रचार सभेत दाखल झाले. यावेळी सुभाष वानखेडे तुम आगे बडो… हम तुम्हारे साथ है, माधवराव पटेल तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है… अश्या घोषणाबाजी आणि फटाक्याच्या अतिशबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील खैरगाव, पार्डी, सिरंजनी, कार्ला, हिमायतनगर, सिबदरा आदींसह अनेक ठिकाणच्या युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले कि, विरोधी पक्षाच्या बाबतीत सांगायचे झाले तर काल हादगावला शिवसेनेची सभा झाली. उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी नसल्याने २ तास माणसे गोळा करण्याची वाट पाहावी लागली. आणि ४ दिवसापासून मोबाईलवर आर्ची येणार.. आर्ची येणार…आर्ची येणार…… हे कश्यामुळे तर शिवसेनेचा नेता येणार आहे. आर्चीचे नाव घेतले तर लोक गोळा होतील…. पण सभा घ्यायला नटी आणायची तर आणावे… परंतु लोकांना अर्चिच्या नावाखाली बोलावून दिशाभूल करायला पाहिजे नव्हती. एवढेच नव्हे तर ठाकरे यांचे भाषण सुरु झाले कि अनेकजण उठून जाऊ लागले असल्याची चर्चा होत होती. मागील साढेचार वर्षाच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाने लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच दिले नाही.

४ वर्ष झाले शेतकरी कर्जमाफीचा मला तर अजूनही पत्ता लागला नाही तुम्हाला लागला तर काय काही …? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे याना शेतकऱ्यांबद्दल कोणतीच आस्था नाही. शेतकरी मेला तरी त्याना काही देणंघेणं नाही. केवळ देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे याना मोकळी सोडण्यात आली आहे. मुंबई जर ठाकरे यांच्या हातातून गेली तर ते जगू शकणार नाही… राहू शकणार नाही … अशी परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा घणाघाती टीका केली. तसेच गेल्या ५ वर्षांपासून सरकार कर्जमाफी देत नाही, कर्जमाफी देण्याला शेतकऱ्याची जान असलेला नेता त्या ठिकाणी बसला पाहिजे. ती जान फक्त अशोक चव्हाण साहेबामध्ये आहे, त्यांनी कर्जमाफी दिली… तेंव्हा दुसऱ्या दिवशी बैंकेमध्ये कर्ज उपलब्ध झाले होते. परंतु या सेना- भाजप सरकारच्या काळात गारपिटीचे पैसे नाहीत…, चार वर्षांपासून ऑनलाईन करा म्हणतात….., ३० तारीख देतात…. वरून ऑनलाईन बंद करतात….. हे सगळे धंदे यांचेच आहेत. या प्रकारे भाजप सेनेने दिशाभूल करून जनतेची मते लाटून सत्ता मिळवीली. परंतु आश्वासनाची पूर्तता अद्यापही केली नाही, स्विस बैन्केतील काळा पैसे बाहेर काढून प्रत्येकाच्या खात्यात १५ लक्ष रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही १५ लक्ष तर सोडा १५ पैसेदेखील कोणाच्या खात्यात आले नाही. उलट जनधनचे खाते काढण्याच्या नावाखाली प्रत्येकी ५०० रुपये घेऊन जनतेचीच लूट केली. आणि आता ऑनलाईनमुळे एकच खाते ठेवता येणार अशी सक्ती काढून खाते बंद करण्याची वेळा आणली जाणार आहे. कर्जमाफीची ढोंग रचत शिवसेनेचे मंत्री खिश्यात राजीनामे घेऊन फिरत होते. परंतु राजीनामे काही दिले नाहीत.. खिशातच फाटून गेले. एकेकाळी अमित शहाचा विरोध करणारे उद्धव ठाकरे खुद्द फॉर्म भरण्यासाठी गुजरातला जाऊन जनतेला उल्लू बनविण्याचे काम करत आहेत. साढे चार वर्ष एकमेकाविरोध शिव्या देऊन घेणारे भाजप -शिवसेनेचे पदाधिकारी आता पुन्हा सत्तेच्या लालचेपाई एकमेकांचे गोडवे गात आहेत. त्यामुळे यांच्या कूटनीतील ओळखून काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा हे सांगण्यासाठी मी आलो आहे.

पुढे जवळगावकर म्हणाले कि, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबानाच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळून देण्यापासून ते शहराची पाणी टंचाई कायम दूर करण्यासाठी १९ कोटीची नळयोजना मंजूर करून आणली. हे काम आजवर मार्ग लागायला पाहिजे होते, ती नळयोजना पूर्ण करण्याची धमक विद्यमान आमदारांमध्ये राहिली नाही. तसेच पैनगंगा नदीवरील मुरली या ठिकाणी मी आणि प्रदीप नाईकांच्या सहकार्यांनी हा बंधारा बांधला. तसेच सर्व समाजाच्या स्मशान भूमीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून कामे पूर्णत्वास नेली. परंतु आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम शिवसेनेवाले करत आहेत. हदगाव – हिमायतनगर मतदार संघात फिरताना लोक म्हणतात कि ४.५ वर्ष झाले अजून आम्ही आमदाराला पाहिलेले नाही. त्यामुळे जनतेचे काम करणारा आपला माणूस आपल्या मतदार संघातील माणूस निवडून दिला पाहिजे. म्हणून दि.१८ तारखेला सकाळी उठून भगवंताचे दर्शन घेऊन मतदान केंद्रावर जायचे आणि हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र असलेले सुभाष वानखेडे यांच्या नावासमोरील पंजा या निशाणीचे बटन दाबून हिमायतनगर तालुक्यातून ७० एक्के असे सर्वाधिक मतदान देऊन विजयी करावे असे आवाहन हातजोडून माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित जनतेला केले.

….अनिल मादसवार, नांदेड.

You may also like

Popular News